National Masters Athletics: राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी; महिला संघ सर्वसाधारण विजेता

४५व्या अजिंक्यपद स्पर्धेत ३२ पदकांची कमाई; स्मिता सकपाळ यांची चार सुवर्णपदकांसह चमकदार कामगिरी
National Masters Athletics
National Masters AthleticsPudhari
Published on
Updated on

पुणे : 45 व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

National Masters Athletics
PDFA League Football: पीडीएफए लीग फुटबॉल स्पर्धेत खडकी, सीएमएस फाल्कन आणि स्ट्रायकर्स एफसीची दमदार विजय नोंद

देशभरातून आलेल्या सुमारे 2200 अनुभवी खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण 32 पदकांची लयलूट केली. या यशस्वी खेळाडूंचा गौरव करण्यासाठी पुणे जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महिला गटात स्मिता सकपाळ (वय 55 वर्षांवरील) यांनी 4 सुवर्णपदके जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले. रेवती मोरे यांनी थाळी व गोळा फेकीत सुवर्ण,

National Masters Athletics
Tukaram Maharaj Palkhi Dehu: आम्ही जातो तुम्ही कृपा असु द्यावी...

तर दीपाली गायकवाड हिने 100 व 200 मीटरमध्ये रौप्यपदके मिळवली. 70 वर्षांवरील गटात सरस्वती साबळे यांनी रिलेमध्ये सुवर्ण आणि चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले. 65 वर्षांवरील वयोगटात संगीता खंडागळे यांनीही सुवर्ण आणि रौप्यपदकांची कमाई केली.

National Masters Athletics
Alandi Padya Puja Controversy | माऊलींच्या पादुकांऐवजी विश्वस्तांच्या पाद्यपूजेवरून वाद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुरुष गटात 35 वर्षांवरील वयोगटात मुकेश कोळी यांनी 5 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, अविनाश भंडारे, राकेश दिसले, मनोज

दिसले, उमेश पाटील, संजय शिंदे, राम जागडे आणि रवींद्र बोऱ्हाडे यांनी धावणे, रिले आणि बांबू उडी या प्रकारांत पदकांची लयलूट केली. या यशाबद्दल संघटनेचे सचिव तनवीर शेख यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news