

पुणे : पीडीएफए लीग फुटबॉल स्पर्धेच्या द्वितीय श्रेणी गटाच्या सामन्यात खडकी ब्ल्युज् स्पोट्र्स असोसिएशन, सीएमएस फाल्कन, गलॅक्टीक वॉरीयर्स, जीओजी, स्ट्रायकर्स फुटबॉल क्लब, युनिक वानवडी आणि बोपोडी एफसी या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून
विजयी आगेकूच केली.
द्वितीय श्रेणी गटाच्या सामन्यात सौरभ यादव याने केलेल्या गोलामुळे खडकी ब्ल्युज् स्पोट्र्स असोसिएशन संघाने लेजेंड्स फुटबॉल ॲकॅडमीचा 1-0 असा पराभव केला. आकाश थापा आणि श्रनय सहाने यांनी केलेल्या गोलांमुळे सीएमएस फाल्कन ब संघाने युनायटेड पूना स्पोट्र्स ॲकॅडमीचा 3-1 असा पराभव केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात गलॅक्टीक वॉरीयर्स फुटबॉल
क्लबने डेक्कन इलेव्हन ड संघाचा 7-0 असा पराभव केला. गलॅक्टीक संघाकडून ज्योएल अनियंककुंजू व फवाद धुंदवारे यांनी प्रत्येकी दोन गोल केले. ट्रॅव्हीस डेनझल, निशांत प्रचंडे आणि आयान सय्यद यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. गेम ऑफ गोल्स् ब संघाने व्होबा एफसी ब संघाचा
7-0 असा सहज पराभव केला. जीओजी संघाकडून करण प्रजापती याने चार गोल नोंदविले. आदित पंडित व एन.आर. कुशलअप्पा यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
सिटी एफसी आणि मॅथ्यु एफसी यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. सिटी एफसी पुणे संघाकडून श्लोक मोरे याने दोन गोल केला. मॅथ्यु फुटबॉल ॲकॅडमीकडून लव्य असरानी आणि ओम पटेल यांनी गोल केले. स्ट्रायकर्स फुटबॉल क्लब, पुणे संघाने इंद्रायणी स्पोट्र्स क्लबचा 7-2 असा पराभव केला. स्ट्रायकर्स एफसीकडून यशवर्धन टेकवडे याने तीन गोल, जॉर्ज पिल्ले आणि गणेश कदम यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले.