Maharashtra Heavy Rain Forecast IMD: महाराष्ट्रात पुढील २४ ते ४८ तास अतिवृष्टीचा इशारा; कोकण-मुंबईसह घाटमाथ्यावर धोक्याची शक्यता

हवामान विभागाचा अलर्ट जारी; कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहणार
Pune Rain Update
Pune Rain UpdatePudhari
Published on
Updated on

पुणे: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील २४ ते ४८ तास मान्सून सक्रिय राहणार असून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Rain Update
Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर पावसाचे पाणी; कामशेत परिसरात दोन मार्गिका पाण्याखाली

मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. पुणे,सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दरडी कोसळणे, सखल भागांत पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Pune Rain Update
Pune Heavy Rain 2026: पुणे जिल्ह्यात विक्रमी पाऊस; चिंचवडमध्ये 200 मिमी, लोणावळ्यात 670 मिमी पावसाची नोंद

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विखुरलेल्या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Pune Rain Update
Mumbai-Pune Train: मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प! कर्जत–लोणावळा घाटात दरड कोसळली; कोणत्या गाड्या रद्द?

विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात.

एकंदरीत पुढील दोन दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून कोकण, मुंबई महानगर परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा सर्वाधिक प्रभाव राहील. नदी-नाले, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Rain Update
Pune Vegetable Market Prices: पुणे मार्केट यार्डात पावसाचा फटका; आवक घटली, टोमॅटो-फ्लॉवरसह भाज्या महागल्या

आगामी २४ तासांतील महाराष्ट्राचा पावसाचा अंदाज (विभागनिहाय)

  • मुंबई शहर, मुंबई उपनगर: जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी

  • कोकण: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस

  • मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, सोलापूर

अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस

  • घाटमाथा: अतिमुसळधार पावसाची शक्यता

  • उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव

हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी

  • मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड,विखुरलेल्या ठिकाणी मध्यम पाऊस, काही भागांत जोरदार सरी

  • विदर्भ: नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

  • बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news