Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा जोर ओसरला; किमान तापमानात किंचित वाढ

राज्यात थंडीचा जोर ओसरला; किमान तापमानात किंचित वाढ
Weather Update
Weather UpdatePudhari
Published on
Updated on

पुणे : राज्यातील थंडीत किंचित घट झाली असून, किमान तापमान वाढले आहे. बुधवारी मोहोळ येथे सर्वात कमी 8.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.

Weather Update
Pune Prayagraj Special Train: प्रयागराजसाठी पुण्यातून दोन ‘वन-वे’ स्पेशल गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

गेले काही दिवस राज्यात थंडीचा प्रभाव वाढला आहे. हंगामातील किमान तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, आता पुढील काही दिवस रात्रीचे तापमान उबदार राहणार आहे. किमान तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Weather Update
Shiv Sena MNS alliance: पुण्यात शिवसेना–मनसे युतीचा जल्लोष; टिळक चौकात कार्यकर्त्यांचा जलदंगळ

बुधवारी राज्यातील विविध शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे : नाशिक 9.5, रत्नागिरी 17.1, परभणी 11.1, कोल्हापूर 15.3, सातारा 12.1, सोलापूर 13.8, कुलाबा 21, उदगीर 12.4, महाबळेश्वर 12, माथेरान 16.8, पणजी 18.1, नंदुरबार 13, डहाणू 16.3, पुणे 9.9, हर्णे 21.4, सांताक्रूझ 20.3, बारामती 9.6, नांदेड 11.2, सांगली 13.2, जेऊर 9, मालेगाव 9.8, धाराशिव 10.4, अहिल्यानगर 9.3, जळगाव 9.7, अलीबाग 21.1 अंश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news