Pune Prayagraj Special Train: प्रयागराजसाठी पुण्यातून दोन ‘वन-वे’ स्पेशल गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

हिवाळी सुट्ट्या व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा निर्णय; 27 व 31 डिसेंबरला विशेष धाव
Pune Prayagraj Special Train
Pune Prayagraj Special TrainPudhari
Published on
Updated on

पुणे : हिवाळी सुट्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे ते प्रयागराज यादरम्यान दोन एकमार्गी (वन-वे) विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Prayagraj Special Train
Shiv Sena MNS alliance: पुण्यात शिवसेना–मनसे युतीचा जल्लोष; टिळक चौकात कार्यकर्त्यांचा जलदंगळ

अशा धावणार विशेष गाड्या...

1) गाडी क्रमांक 01411 (पुणे-प्रयागराज विशेष)

- ही गाडी पुण्यातून शनिवारी 27 डिसेंबर 2025 रोजी पुणे स्थानकावरून सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि सोमवारी 29 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी प्रयागराजला पोहचेल.

Pune Prayagraj Special Train
Social Initiative Pune: युवकांच्या पुढाकारातून २००० शाळकरी मुलांना हुडीज, जॅकेट्‌सचे वाटप

2) गाडी क्रमांक 01499 (पुणे प्रयागराज विशेष)

- ही गाडी बुधवारी 31 डिसेंबर 2025 रोजी पुणे स्थानकावरून सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि शुक्रवार दि. 2 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी प्रयागराजला पोहचेल.

Pune Prayagraj Special Train
PMPML Tourism Bus Service: पीएमपीएमएल पर्यटन बससेवा क्र. 6 व 7 मध्ये नवी प्रेक्षणीय स्थळे समाविष्ट

या ठिकाणी प्रमुख थांबे...

या दोन्ही गाड्या प्रवासात हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी आणि फतेहपूर यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news