Maharashtra MCA MHMCT CET Registration 2026: एमसीए सीईटीसाठी ५५,५४२ नोंदणी; एमएचएमसीटीसाठी अवघे ५५ अर्ज

अर्ज दुरुस्तीची ऑनलाइन सुविधा २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान; मार्चमध्ये संगणकाधारित परीक्षा
CET
CETPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) व मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम एचएमसीटी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली. मुदतीअखेर यंदा एमसीएच्या प्रवेश परीक्षेसाठी 55 हजार 542, तर एम एचएमसीटीच्या प्रवेश परीक्षेसाठी यावर्षी 55 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

CET
PCI Aadhaar Biometric Attendance Rule: फार्मसी महाविद्यालयांसाठी आधार-लिंक बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची

मागील वर्षी एमसीए सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये 56,257 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 2025 पेक्षा 715 विद्यार्थ्याची नोंदणी यावर्षी कमी झाली आहे. तर मागील वर्षी एम एचएमसीटीच्या सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 2025 पेक्षा 25 विद्यार्थ्यांची नोंदणी यावर्षी कमी झाली आहे. एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दि. 30 मार्च 2026 रोजी होणार आहे. तर, एम. एचएमसीटी या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 25 मार्च 2026 रोजी होणार आहे. सीईटी संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. 2026 च्या सीईटीसाठी एमसीए व एम. एचएमसीटी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीला 7 जानेवारी 2026 पासून सुरुवात झाली होती आणि नोंदणीची अंतिम तारीख 10 फेबुवारी होती. याला 18 फेबुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली होती तसेच दुसरी व अंतिम मुदतवाढ 23 फेबुवारीपर्यंत देण्यात आली होती.

CET
March Sugar Quota Price Outlook: मार्चसाठी २२.५ लाख टन साखर कोटा; दर तेजीत राहण्याची शक्यता

आजपासून करता येणार अर्जातील दुरुस्ती

एमसीए व एम एचएमसीटी अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी काही विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्तीची सुविधा दिनांक 26 फेबुवारी ते 28 फेबुवारी 2026 यादरम्यान उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करायची आहे. विद्यार्थ्यांना अर्जात त्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग यामध्ये बदल करता येणार असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news