Maharashtra Mahavir Kesari Wrestling Competition: महाराष्ट्र महावीर केसरी कुस्ती स्पर्धा 10 मार्चला

विजेत्याला 1.25 लाख, चांदीची गदा; देशभरातील नामांकित मल्लांची उपस्थिती अपेक्षित
Kusti
KustiPudhari
Published on
Updated on

पुणे: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‌’राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा- 2026‌’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एमआयटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. महेश थोरवे आणि सचिव प्रा. विलास कथुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Kusti
WhatsApp Video Religious Sentiment Notice: दौंडमध्ये व्हॉट्सअॅपवरील व्हिडिओवरून कारवाई

ही स्पर्धा मंगळवार दि. 10 मार्च रोजी लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन येथे पार पडणार आहे. या स्पर्धेचे हे 19 वे वर्ष असून, महाराष्ट्रासह देशभरातील नामांकित मल्ल यात सहभागी होणार आहेत. मुख्य ‌’महावीर केसरी‌’ किताबाच्या विजेत्याला 1 लाख 25 हजार रुपये रोख, चांदीची गदा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. द्वितीय क्रमांकास 1 लाख, तृतीय क्रमांकास 50 हजार आणि चतुर्थ क्रमांकास 25 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. तसेच 57 किलो ते 125 किलो वजनी गटातील विजेत्यांना रोख रखमेसह पदके व प्रमाणपत्रे दिली जातील.

Kusti
Baramati ACB Bribery Case: बारामतीत सातबारा नोंदीसाठी 15 हजारांची लाच; एसीबीच्या सापळ्यात खासगी व्यक्ती

याच दिवशी 75 वर्षांवरील ज्येष्ठ मल्लांसाठी ‌’योगमहर्षी रामचंद्र गोपाळ शेलार (शेलारमामा) स्मृती कुस्ती स्पर्धा‌’ हे विशेष आकर्षण असेल. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9 वाजता होईल, तर पारितोषिक वितरण संध्याकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. या सोहळ्यासाठी अर्जुन पुरस्कारविजेते नरसिंग यादव, हिंदकेसरी जगदीश कालीरमण, दीनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, विजय बनकर यांसारखे दिग्गज मल्ल उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा विविध सात वजनी गटांत होणार असल्याचे कथुरे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news