Maharashtra ITI Admission 2026: 21 मेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; राज्यात 1.57 लाख जागांवर प्रवेश

सरकारी आणि खासगी मिळून 1,004 आयटीआय संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया; 1 जूनपासून प्राधान्यक्रम नोंदणी
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

पुणे: शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमधील प्रवेश प्रक्रियेला अखेर सुरुवात होणार असून 21 मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्यभरात यंदा 1 लाख 57 हजार जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, 1 जूनपासून विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम नोंदविता येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने वेळापत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Admission
Pune Police Transfers 2026: पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल; संजय दराडे सह पोलिस आयुक्त, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेत

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे यंदाची प्रवेश प्रक्रिया केंद्रिकृत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरणे, शुल्क भरणे, कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेशनिश्चितीची सुविधा याच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Admission
Pune Illegal Fetal Determination: केडगाव-बोरीपार्धी परिसरात गर्भलिंग निदान टोळी गायब; कोट्यवधींच्या रॅकेटवर संशय

विद्यार्थ्यांना 1 जूनपासून व्यवसाय आणि संस्थानिहाय प्राधान्यक्रम (ऑप्शन फॉर्म) भरता येणार आहेत. दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळांकडून वितरित झाल्यानंतर पुढील सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

Admission
Baner PMC Hospital Controversy: बाणेर PMC इमारतीतील खासगी रुग्णालयावर कारवाई रखडली; नोटीसनंतरही चौकशी नाही

प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित केले आहे.

Admission
Pune Hospital Bomb Threat Case: पुणे हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवून खंडणीचा डाव; ATS कडून आरोपीला अटक

राज्यभरात सरकारी आणि खासगी मिळून एकूण 1,004 आयटीआय संस्था असून, त्यामध्ये 1 लाख 57 हजार 664 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील 418 सरकारी आयटीआय संस्थांमध्ये 97 हजार 88 जागा उपलब्ध आहेत, तर 586 खासगी आयटीआय संस्थांमध्ये 60 हजार 576 जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news