

Maharashtra HSC Result 2025 Declared
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नेहमी प्रमाने यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागाने बाजी मारली तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे. फेब्रुवारी 2024 चा निकाल 93.37% होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 1.49 टक्क्यांनी कमी लागली आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.
यंदा या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळांतून राज्यभरात 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 8 लाख 21 हजार 450 मुले,तर 6 लाख 92 हजार 424 मुली होत्या. मुंबई विभागात 3 लाख 51 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
विभागनिहाय निकाल
कोकण - 96.74
कोल्हापूर - 93.64
मुंबई - 92.93
छत्रपती संभाजीनगर - 92.24
अमरावती - 91.43
पुणे - 91.32
नाशिक - 91.31
नागपूर - 90.52
लातूर - 89.46
3373 परीक्षा केंद्रांपैकी 124 केंद्राची होणार चौकशी
3373 केंद्रांपैकी 124 केंद्राची चौकशी होणार आहे. कारण या केंद्रांवर गैरप्रकार आढळला होता. या चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
निकालाचा टक्का घसरला
फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी- मार्च 2025 चा निकाल 1. 49 टक्क्यांनी कमी आहे.
दरम्यान, राज्यात 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत एकूण 15, 05, 037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात 8, 10, 348 मुले आणि 6, 94, 652 मुली यांचा समावेश होता. महाराष्ट्रातीस 3,373 मुख्य केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती.