पुणे : प्रतिनिधी
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांना पुढील शिक्षणासाठी कोणकोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा याची माहितीच नसल्याचे दिसून येते. अशावेळी विद्यार्थी वेगळी वाट न निवडता पारंपरिक मार्ग स्वीकारतात. त्यामुळे अनेक चांगल्या संधीना ते मुकतात. त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आजच्या परिस्थितीत बारावीनंतर पुढे शिकण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असल्याचे दिसून येत आहेत.
प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शकांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी केवळ कला, वाणिज्य, विज्ञान अशा शाखांच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश न घेता अभियांत्रिकी, वैद्यकीय, अलाईड हेल्थ सायन्सेस, पॅरामेडिकल, शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम आदी विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांचा विचार करून प्रवेश घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार किंवा नोकरीची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
इंजिनिअरिंग क्षेत्रात विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आजही चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाचे महत्त्व आणि संबंधित क्षेत्रातील मागणी ओळखून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग-(४ वर्ष बीई, बीटेक), प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा (ईएएमसीईटी, आयआयटी, एआयईईई, बीटसॅट यासह इतर)
विविध पर्याय :
सिव्हिल इंजिनिअरिंग , मॅकेनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, ऍरोनोटिकल इंजिनिअरिंग, ऐरोस्पेस इंजिनिअरिंग, ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, ऍटोमोबाईल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायो टेक्नोलॉजी इंजिनिअरिंग, सीरॅमिक इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, इनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग, सिल्क आणि टेक्सटाईल इंजिनिअरिंग.
वैद्यकीय क्षेत्र :
वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रात मनुष्यबळाची मागणी आहे, अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन उत्तम करिअर विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाचा कालावधी (पाच वर्षे )- प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा (ईएएमसीईटी,नीट)
विविध पर्याय : एमबीबीएस – ऍलोपॅथीक, बीयूएमएस – यूनानी, बीएचएमएस- होमीओपॅथी, बीएएमएस- आयुर्वेद, बीएनवायएस-नॅचरोपॅथी, बीडीएस – डेंटल, बीव्हीएस्सी – व्हेटरनरी, बीपीटी -फिजीओथेरपी
वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याचे अनेकवेळा जाणवते. अशावेळी कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांसह अन्य तज्ज्ञ व्यक्तींबरोबर काम करण्यासाठी संबंधित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपयोगी ठरू शकतात.
अलाईड हेल्थ सायन्सेस-
अभ्यासक्रमाचा कालावधी (२ ते ३ वर्षे ), बी. फार्मसी, बी.एस्सी.नर्सिंग, बीओटी- ऍक्युपशनल थेरपी, बी.एस्सी.-अनेस्थेशिया, बी.एस्सी.-कार्डियाक टेक, बी.एस्सी-मेडिकल लॅब टेक, बी.एस्सी.- रेडिओ थेरपी टेक, बी.एस्सी-क्लिनिकल ऑप्टोमॅट्री, बी.एस्सी -नूक्लीअर मेडिसीन, बी.एस्सी-ऑपरेशन थिएटर, बी.एस्सी-फिजीशियन असिस्टंट, बी.एस्सी-रेस्पीराटोरी, बीएमएलटी -मेडिकल लॅब टेक्नोलॉजी, वैद्यकीय क्षेत्रात कुशल टेक्निशियनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच डायलेसिस, ईसीजी, एक्स-रे, ऑपरेशन थिएटरमध्ये काम करण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. पॅरामेडिकल, डायलेसिस टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन.
अध्यापन कार्य
शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
विविध पर्याय ः डी.एड, पेट टिचर, चाईल्डहूड केअर एज्युकेशन.
लष्करी सेवा
लष्करी सेवेची आवड अनेक विद्यार्थ्यांना असते, परंतु यासाठी अथक परिश्रम आणि बुध्दिचातुर्याची जोड आवश्यक असते. त्यासाठीच ज्यांना देशसेवेसाठी लष्करी सेवेत जाण्याची इच्छा आहे, असे विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.
विविध पर्याय ः एनडीए, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स.
वेगळ्या वाटा…!
पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन वेगळ्या वाटा शोधणार्या विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
विविध पर्याय ः फॉरेन लँग्वेज, फायर सेफ्टी, जर्नालिझम, होम सायन्स, टूरीझम, हॉटेल मॅनेजमेंट, रूरल डेव्हलपमेंट.
डिझायनिंग
वेगवेगळ्या डिझाईन हा लोकांच्या उत्सुकतेचा आणि आवडीचा विषय आहे. यामध्ये कपड्यांपासून ते घरांपर्यंत गाड्यांसाठी, उत्तम ऑफिसेससाठी तसेच वेगवगेळ्या ज्वेलरींची लोकांना भुरळ असते. त्यामुळे डिझायनिंग क्षेत्रातदेखील विद्यार्थ्यांना विविध संधी असल्याचे पहायलाय मिळत आहे.
विविध पर्याय ः डिझायनिंग, फॅशन, इंटेरिअर, ज्वेलरी.
चित्रपट, संगीत
भारतात चित्रपट, लघुपट, संगीत या गोष्टींना फार मोठी पार्श्वभूमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे या क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे देखील पहायला मिळते. त्यामुळे या क्षेत्राची आवड असणार्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत.
विविध पर्याय ः फिल्म मेकिंग, डायरेक्शन, स्क्रिन रायटिंग, सिनेमेटोग्राफी, साऊंड डिझाईन, एडीटिंग, ऍक्शन.
व्यवस्थापन
व्यवस्थापन क्षेत्रात दिवसेंदिवस मनुष्यबळाची मागणी वाढत आहे, पंरतु या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ज्यांना व्यवस्थापन क्षेत्रात रूची आहे, अशा विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.
विविध पर्याय ः मॅनेजमेंट , फायनान्स मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट.
पदवी अभ्यासक्रम
कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून वेगळ्या वाटा निवडणे किंवा त्याच शाखांमध्ये पदव्युत्तर पदवी करणे हा उत्तम पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतो. पदवी – अभ्यासक्रमाचा कालावधी (तीन वर्षे)
विविध पर्याय ः बीए, बीए-एचईपी, बीए-एचटीपी, बीए-लिंग्वेस्टिक, बीए- इकॉनॉमिक्स, बीए-सायकोलॉजी, बीए-फाईन आर्टस्, बीए-पॉलिटीकल सायन्स, बीए-सोशिओलॉजी, बीए-लायब्ररी सायन्स.
बी.एस्सी.- बी.एस्सी – ऍग्रीकल्चरल, बी.एस्सी-एमपीसी, बी.एस्सी-एमईसी, बी.एस्सी- ऍप्लाईड मॅथ्स्, बी.एस्सी- बीझेडसी, सीबीझेड, बी.एस्सी-सीपीझेड, बी.एस्सी – हॉर्टिकल्चर, बी.एस्सी -कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी – होम सायन्स, बी.एस्सी – बायोकेमीस्ट्री, बी.एस्सी – मायक्रोबायोलॉजी, बी.एस्सी -बायो-टेक, बी.एस्सी-
डेअरी सायन्स, बी.एस्सी- अँथ्रोपोलॉजी
बी.कॉम.- बी.कॉम- रेग्युलर, बी.कॉम-कॉम्प्युटर, बी.कॉम-बँक मॅनेजमेंट, बी.कॉम-टॅक्स प्रोसीजर.
इतर पदवी अभ्यासक्रम-
एलएलबी, बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनीस्ट्रेशन), बीसीए (बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन), बीबीएम (बॅचलर इन बिझनेस मॅनेजमेंट), बीएएफ (बॅचलर इन अकाऊंट ऍण्ड फायनान्स), बीएफएम (बॅचलर इन फायनान्स मॅनेजमेंट), बीएमएस (बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज).
संयुक्त पदवी अभ्यासक्रम-
बीए-बीएड, बीएस्सी-बीएड, बीए-एलएलबी, बीकॉम-एलएलबी, बीबीएम-एलएलबी, बीबीए-एलएलबी.
व्यावसायिक अभ्यासक्रम-
आयसीडब्ल्यूए, सीए, सीपीटी-एटीसी-आयपीसीसी, आयटीटी.