Maharashtra Heatwave: राज्यात उष्णतेची लाट सुरूच; चंद्रपूरचा पारा 45 अंशांवर

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची जोरदार लाट सक्रिय आहे.
Maharashtra Heatwave
Maharashtra HeatwavePudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात उष्णतेची लाट सुरूच असून, गुरुवारी सर्वच भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली. चंद्रपूर येथे 45 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची जोरदार लाट सक्रिय आहे. राज्यात उष्माघाताने 50 हून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे दुपारी 12 ते 5 या वेळेत फिरताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Maharashtra Heatwave
Baramati Politics : 'दादां'नंतरच्या बारामतीचे भयाण वास्तव! सैरभैर मनं, राजकीय अराजकता आणि गुन्हेगारीचे गडद सावट

गुरुवारचे कमाल तापमान : चंद्रपूर 45, वर्धा 44.2, यवतमाळ 43.2, अमरावती 44.2, अकोला 44.3, बुलडाणा 41.3, पुणे 39.8, अहिल्यानगर 41.9, नाशिक 38.2, सातारा 39.5, सोलापूर 42.2, मुंबई 36.2.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news