महाराष्ट्राच्या मुलींचा सलग दुसरा विजय

महाराष्ट्राच्या मुलींचा सलग दुसरा विजय
Published on
Updated on

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  सुपरस्टार रेडर पूजा यादव आणि मेघा कदमने सुरेख खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा 36 व्या नॅशनल गेम्समध्ये विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्र महिला संघाने दुसर्‍या सामन्यात यजमान गुजरातला धूळ चारली. स्नेहलच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने 46-22 ने दणदणीत सामना जिंकला.  महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम खेळीतून गुजरातवर चार लोन मारले. यासह टीमने शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात आपले वर्चस्व राखून ठेवले. यासह महाराष्ट्र संघाला सलग दुसर्‍या सामन्यात धडाकेबाज विजयाची नोंद करता आली. महाराष्ट्राच्या नवदुर्गांनी नवरात्रीच्या दुसर्‍या माळेला विजय साजरा केला. प्रशिक्षक संजय मोकळ यांच्या अचूक डावपेचातून महाराष्ट्राने एकतर्फी विजय साकारला. आता महाराष्ट्र संघाला बुधवारी विजयी हॅटि्ट्रकची संधी आहे. महाराष्ट्राचा गटातील तिसरा सामना बिहारशी होणार आहे.

पूजा, मेघाची सर्वोत्तम खेळी
महाराष्ट्र संघाने मंगळवारी गटातील दुसर्‍या सामन्यासाठी संघात एक बदल केला. बोनसची स्टार सोनाली शिंगटेला विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी पूजा यादवला संधी देण्यात आली. याच विश्वासाला सार्थकी लावताना पूजा यादवने सुरेख चढाई करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आपल्या शैलीदार चढाईतून तिने यजमान गुजरातविरुद्ध सर्वाधिक गुणांची कमाई केली. त्याचबरोबर अशाच प्रकारची तोडीस तोड खेळी मेघा कदमने केली. त्यामुळे संघाच्या मोठ्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला. यातून चार लोनने गुजरातला धूळ चाखावी लागली.

अंकिता, सायलीची अचूक पकड
महाराष्ट्र संघातील गुणवंत खेळाडू अंकिता जगताप आणि सायली जाधवची खेळी लक्षवेधी ठरली. त्यांनी आपल्या अचूक पकडीतून गुजरात टीमच्या रेडरचा गडी मारण्याचा प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडला. त्यामुळे गुजरात टीमला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पकडीतून अंकिता आणि सायलीने सामना गाजवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news