Manual typing course closed Maharashtra: मॅन्युअल टायपिंगचा खडखडाट कायमचा बंद; टायपिंग कोर्समध्ये आता फक्त संगणकीय प्रशिक्षण

१२ वर्षांनंतर राज्य सरकारचा निर्णायक निर्णय; विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांकडे वळवण्याचा प्रयत्न
Manual typing course closed Maharashtra
मॅन्युअल टायपिंगचा खडखडाट कायमचा बंदPudhari
Published on
Updated on

पुणे : राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये संगणकाचा वापर वाढत असल्याचे सांगत मॅन्युअल टायपिंग कोर्स 2013 सालामध्ये टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे जाहीर केले. त्याला तब्बल 12 वर्षे वेगवेगळ्या कारणांनी मुदतवाढ देण्यात आली. परंतु अखेर राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी धाडसी निर्णय घेत मॅन्युअल टायपिंग कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता टायपिंग संस्थांमध्ये केवळ संगणक टायपिंगच शिकविले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)

डॉ. बेडसे म्हणाले, राज्यामध्ये 3 हजार 179 मशीन टंकलेखन संस्थांची नोंदणी असली, तरी त्यापैकी 3013 संस्था या संगणक टंकलेखन संस्थांमध्ये परावर्तित झालेल्या आहेत. मशीन टायपिंग कोर्स हा कालबाह्य झाला. त्याऐवजी संगणक टायपिंग, डिजिटल कौशल्ये आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कोर्सेसला प्राधान्य दिल्यास विद्यार्थी अधिक सक्षम बनतील आणि त्यांना नोकरीच्या संधी अधिक मिळतील. या पार्श्वभूमीवर राज्यातील शासनमान्य वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय 2013 साली घेण्यात आला. परंतु त्याला विविध कारणांनी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

Manual typing course closed Maharashtra
Pune footpath narrowing issue: पदपथ अरुंद करण्याचा निर्णय थांबवला; खासगी वाहनांच्या बाजूने मनपाचा कल?

मागील पाच वर्षात मशीन टंकलेखन व संगणक टंकलेखन परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर जून 2015 मधील मशीन टंकलेखन परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या 3 लाख 59 हजार 285 विद्यार्थी संख्येच्या तुलनेत जून, 2025 मध्ये 2 हजार 107 म्हणजेच अवघे 0.58 टक्के विद्यार्थी प्रविष्ट झाले. या उलट जून 2016 मधील संगणक टंकलेखन परीक्षेमधील 7 हजार 865 प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढून जून, 2025 मध्ये 1 लाख 87 हजार 147 इतकी झाली आहे. त्यामुळे मॅन्युअल टायपिंगपेक्षा संगणक टायपिंग करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्यामुळे अखेर मॅन्युअल टायपिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Manual typing course closed Maharashtra
Pune Double Decker Bus: पुण्यात धावणार डबलडेकर इलेक्ट्रिक बस; वैशिष्ट्ये काय, कोणत्या मार्गांवर ट्रायल रन?

2013 पासून वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर अखेर 12 वर्षांनी मॅन्युअल टायपिंग बंद करण्यास मुहूर्त. यापुढे आता संस्थांमध्ये केवळ संगणक टायपिंगच शिकविले जाणार

मशीन टायपिंग बंद करण्याची कारणे काय...

1) सर्वच कोर्सेस हे संगणक टंकलेखन अभ्यासक्रमात समाविष्ट.

2) कंपन्यांकडूनही मशीन टाइपराइटरची निर्मिती बंद.

3) सर्व कार्यालयात टाइपराइटर यंत्राचा वापर पूर्णपणे बंद.

4) मशीन टायपिंग संस्थांच्या प्रमाणपत्र वाटपात आणि परीक्षेत मोठे गैरप्रकार.

5) संस्थाचालक विद्यार्थ्यांची फसवणूक.

6) अत्यल्प विद्यार्थी प्रवेश; परिणामी परीक्षा घेणे आर्थिकदृष्ट्‌‍या न परवडणारे.

7) अनेक संस्थाचालकांकडून व जिल्हा संघटनांकडून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news