Maharashtra Disabled Students Survey: दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण १० जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश

० ते १८ वयोगटातील विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांची १०० टक्के नोंदणी करण्यावर भर; यू-डायस अद्ययावत करून शासकीय सेवासुविधांचा लाभ सुनिश्चित करण्याचे आदेश
Disability
DisabilityPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील शाळांमध्ये शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती १० जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक देविदास कुलाळ यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी तसेच महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Disability
PMC Junior Engineer Recruitment Paper Leak: कनिष्ठ अभियंता भरतीतील कथित पेपरफुटीवरून महापालिकेसमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

कुलाळ यांच्या निर्देशानुसार, विदर्भ विभाग वगळता उर्वरित जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ० ते १८ वयोगटातील विशेष गरजाधारक दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण १० जुलैपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्यासंदर्भात कळवले आहे. दिलेल्या मुदतीत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी केंद्रात समायोजन झालेल्या सर्व १०० टक्के विशेष शिक्षकांना (केंद्रस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर) त्यांना नेमलेल्या केंद्रात सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत तत्काळ सूचना देणे गरजेचे आहे.

Disability
Purandar Illegal Money Lending: पुरंदरमध्ये खासगी सावकारीचे जाळे विस्तारले; अवाजवी व्याजामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक

सर्वेक्षणदरम्यानचा दि. १५ जून ते १० जुलैपर्यंतचा दैनंदिन अहवाल सादर करणे गरजेचे आहे. यू-डायस २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती भरणे आवश्यक आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील सर्वेक्षणामुळे राज्यात यू-डायस प्रणालीमध्ये १४ हजार दिव्यांग विद्यार्थ्यांची वाढ झाली होती.

Disability
Purandar Water Crisis: पावसाअभावी पुरंदरमध्ये भीषण पाणीसंकट; दुष्काळाचे सावट गडद

त्यामुळे सर्वेक्षणाचे महत्त्व पाहता सर्व विशेष शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षणासाठी तत्काळ आदेशित करावे. तसेच सर्व स्तरांवरील विशेष शिक्षकांना सर्वेक्षणाव्यतिरिक्त कोणतेही जिल्हा किंवा तालुकास्तर कामकाज वाटप देण्यात येऊ नये.

Disability
Khadakwasla Mutha Canal Desilting: चार वर्षांनंतर खडकवासला मुठा कालव्याच्या गाळ उपसणीला सुरुवात

सर्वेक्षणादरम्यान सर्व दिव्यांग विद्यार्थी यू-डायस प्रणालीमध्ये नोंद होतील. सर्वेक्षण कालावधीत ० ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहिल्यास विद्यार्थ्यास मिळणाऱ्या सेवासुविधांपासून ते वंचित राहील. त्यामुळे दक्षता घेण्याबाबत सूचना द्याव्यात, असे देखील कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news