PMC Junior Engineer Recruitment Paper Leak: कनिष्ठ अभियंता भरतीतील कथित पेपरफुटीवरून महापालिकेसमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

एनएसयूआय आणि शेकडो परीक्षार्थींचा जोरदार आंदोलन; भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि अनियमितता झाल्याचा आरोप करत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि शेकडो परीक्षार्थींनी सोमवारी (दि. २९) महापालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभराच्या आंदोलनानंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

Pune Municipal Corporation
Purandar Illegal Money Lending: पुरंदरमध्ये खासगी सावकारीचे जाळे विस्तारले; अवाजवी व्याजामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक

या वेळी भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप आणि पारदर्शकतेबाबतचे प्रश्न विद्यार्थ्यांनी मांडले. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

Pune Municipal Corporation
Purandar Water Crisis: पावसाअभावी पुरंदरमध्ये भीषण पाणीसंकट; दुष्काळाचे सावट गडद

आंदोलनाला माजी महापौर प्रशांत जगताप, माजी आमदार व माजी महापौर दीप्ती चवधरी तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. भाऊसाहेब आजबे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. एनएसयूआयचे प्रदेश महासचिव ॲड. कृष्णा साठे यांनी, चौकशी, दोषींवर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. प्रशासनाने आश्वासनाची पूर्तता केली नाही, तर उद्याही आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news