

पुणे : राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, शुक्रवार (दि. १९) पासून थंडीची तीव्रता किंचित कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात थंडीची लाट सक्रिय होती. मात्र आता किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.
गुरुवारी गोंदिया येथे राज्यातील सर्वात कमी ८.४ अंश, तर पुण्यात १०.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. पुढील काही दिवसांत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील थंडीची तीव्रता हळूहळू कमी होईल, असे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.