

पुणे : थंडीची लाट सुरु होवून पंधरा दिवस झाले आहेत.यंदाच्या हंगामातील ही सर्वात मोठी लाट ठरली आहे. रविवारी अहिल्यानगर ६.५ तर पुणे शहराचा पारा ८.५ अंशावर खाली आला होता.
रविवारी किमान तापमानात किंचित वाढ असली तरीही बोचऱ्या वाऱ्यांनी हैराण केले होते.राज्यातील किमान तापमानात आगामी २४ तासांत पुन्हा घट होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहिल्यानगर ६.५, पुणे ८.४, जळगाव ९,कोल्हापूर १४.८, महाबळेश्वर १२,मालेगाव ८.२, नाशिक १२.९, सातारा १२.८, सोलापूर १३.६, छ.भाजीनगर १०.२, परभणी ८.९,बीड ८.९, अकोला १०.१, अमरावती ९, बुलढाणा १२.२, ब्रम्हपुरी ११, चंद्रपूर १२, गोदिया ८.२, वाशीम ११.२, वर्धा ९.४, यवतमाळ ८.५.