Pune Theft: वाघोली व नवी पेठेत घरफोडी; १४ लाखांहून अधिक ऐवज चोरी

वाघोलीतील सदनिकेतून १२.३२ लाखांचे, तर नवी पेठेतून १.६२ लाखांचे दागिने लंपास; पोलिसांत गुन्हे दाखल
Pune Theft
Pune TheftPudhari
Published on
Updated on

पुणे : वाघोली भागातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १२ लाख ३२ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली.

Pune Theft
Pune Road Accident: टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ ठार

याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाघोलीतील स्टार सिटी सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

Pune Theft
Pune House Burglary: सदनिकेचे कुलूप तोडून ३९ लाखांचे दागिने लंपास

घरफोडी करून 1 लाख 62 हजारांचा ऐवज चोरी

नवी पेठेत घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Theft
Pune Municipal Corporation Election: 35.51 लाख मतदारांसाठी 4004 मतदान केंद्रे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील नवले पथ परिसरात तक्रारादाराचे बैठे घर आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news