CID On Ajit Pawar Case: अजित पवार मृत्यूप्रकरणी या तीन प्रश्नांची उत्तरं मिळणार; CID तपासाचा अँगल समोर

Addl. director general of police sunil ramanand Maharashtra cid: : गुरुवारी सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषद घेतली.
Maharashtra CID on Ajit Pawar Plane Crash
Maharashtra CID on Ajit Pawar Plane CrashPudhari
Published on
Updated on

Maharashtra CID On Ajit Pawar Plane Crash Case

पुणे : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली असतानाच अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तांत्रिक तपास हा संपूर्ण वेगळा भाग असून CID चा तपास हा आकस्मिक मृत्यू बद्दल आहे', असे सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी गुरुवारी सांगितले.

Maharashtra CID on Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar | अजितदादा गेले, पुढे काय?

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी पोलिसांनी डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी रोहित पवार आक्रमक झाले आहेत. तसेच सीआयडीचा तपास कुठवर आला आहे, याची माहिती द्यावी, अशी मागणीही जोर धरु लागली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलीस अधीक्षक (गुन्हे पथक) याप्रकरणाचा तपास करत असल्याचे स्पष्ट करतानाच रामानंद यांन तपासाचे तीन उद्देशही सांगितले.

Maharashtra CID on Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar death controversy | बारामती विमान अपघातानंतर व्हीएसर कंपनीची ४ विमाने ग्राउंड करण्याचा डीजीसीएचा निर्णय!

CID तपासाचे तीन उद्देश कोणते?

1. कट किंवा घातपात आहे का?

2. गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आहे का?

3. गुन्हेगारीकृत्य आहे का?

CID योग्य कलमांखाली

तपासात घातपात, कट, गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा किंवा कृत्य घडल्याचे निदर्शनास आल्यास सीआयडी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन उर्वरित तपास पूर्ण करणार आणि न्यायालयात खटला चालवणार, असंही रामानंद यांनी सांगितले.

तपास योग्य दिशेने

अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी सीआयडीचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. यात केंद्रीय यंत्रणांकडूनही अहवाल मागवले जात आहेत. तपास समाधानकारक आणि योग्य त्या वेगाने सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.

VSR कंपनीचा निष्काळजीपणा उघड झाला आहे का?

AAIB - विमान अपघात अन्वेषण ब्युरो आणि सीआयडी या दोन्ही यंत्रणाच्या तपासाचा व्याप यात भिन्नता आहे. मात्र, AAIB चा तपास अहवाल हा सीआयडीच्या अहवालातही जोडला जाणार आहे, अशी माहिती रामानंद यांनी दिली. VSR कंपनीबाबत त्यांनी थेट उत्तर दिलेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news