Maharashtra Assembly Polls: अजित पवारांकडून एबी फॉर्म वाटप; कोणाला मिळाली संधी?

Vidhan Sabha Eelection 2024: हडपसरच्या जागेवरून राष्ट्रवादी पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू
Ajit Pawar
अजित पवारांकडून एबी फॉर्म वाटप; कोणाला मिळाली संधी?Pudhari News
Published on
Updated on

Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आल्याने या दोन्ही विद्यमान आमदारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर वडगाव शेरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

शहरातील भाजपच्या तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढील उमेदवारी यादीकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी यादी जाहीर करण्याआधीच आमदार तुपे आणि आमदार टिंगरे यांना सोमवारी एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

Ajit Pawar
Maharashtra Assembly Polls: इच्छुकांमध्ये धाकधूक! कोणी आशेवर,तर कोणी गॅसवर

स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी मुंबईत (Mumbai) या आमदारांना बोलावून एबी फॉर्म दिले असल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी माजी आमदार जगदीश मुळीक यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती.

मात्र, आमदार टिंगरे यांना एबी फॉर्म मिळाला असल्याने आता वडगाव शेरी मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हडपसर मतदारसंघावर महायुतीतील शिवसेनेने दावा केला होता. नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी येथील शिवसैनिकांनी थेट मुंबईवारी सुरू केली होती. मात्र, हे सैनिक मुंबईला पोहचण्याआधीच आमदार तुपे यांच्या हाती एबी फॉर्म पडला असल्याने हडपसरही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ajit Pawar
Maharashtra Assembly Polls: हडपसर मतदारसंघ परंपरा राखणार का?

लढतीचे चित्र मात्र अस्पष्टच

आमदार टिंगरे आणि तुपे यांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कोण? हे अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे येथील चित्र अस्पष्ट आहे. त्यात हडपसरच्या जागेवरून राष्ट्रवादी पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू असून, ही जागा नक्की कोणाला मिळणार, हे अद्याप अस्पष्टच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news