Maharashtra Assembly Polls: इच्छुकांमध्ये धाकधूक! कोणी आशेवर,तर कोणी गॅसवर

Maharashtra Assembly Elections 2024: विद्यमान आमदारांसह इच्छुकांची धाकधूक वाढली असून, कोणी आशेवर तर कोणी थेट गॅसवर असल्याचे चित्र आहे.
 Maharashtra Assembly Poll
इच्छुकांमध्ये धाकधूक! कोणी आशेवर,तर कोणी गॅसवरfile photo
Published on
Updated on

Pune Political News: भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने पाच विद्यमान आमदारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असले, तरी काही मतदारसंघांत राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांसह इच्छुकांची धाकधूक वाढली असून, कोणी आशेवर तर कोणी थेट गॅसवर असल्याचे चित्र आहे.

पुणे (Pune) शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. त्यात भाजपने कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगर येथील विद्यमान आमदारांची उमेदवारी जाहीर केली, तर राष्ट्रवादीने हडपसर आणि वडगाव शेरीच्या आमदारांना एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे उर्वरित मतदारसंघांतील इच्छुकांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला आहे. (Latest Pune News)

 Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly Polls: हडपसर मतदारसंघ परंपरा राखणार का?

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सध्या जोरदार राजकीय घडामोडी घडत असल्याने या ठिकाणी काही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार सुनील कांबळे यांचे नाव पहिल्या यादीत न आल्याने कांबळे समर्थकांची अस्वस्थता वाढली आहे.

त्यातच या मतदारसंघातील काँग्रेसमधील काही इच्छुकांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची मुंबईत भेट घेतल्याची चर्चा रंगली. त्यामुळे आमदार कांबळे यांच्यासह समर्थकांनी मुंबईकडे धावधाव केली. मात्र, उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. तर काँग्रेस इच्छुकांनी आपण फडणवीस यांची भेट घेतली नसल्याचे सांगत यासंबंधीचे वृत्त निराधार असल्याचा दावा केला.

खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांचीही उमेदवारी जाहीर न झाल्याने या मतदारसंघातील घडामोडींना वेग आला आहे. येथील काही इच्छुकांना सोमवारी उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी बोलावून घेतले असल्याचे सांगितले.

 Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly Polls: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील

त्यामुळे खडकवासल्यात बदल होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर वडगाव शेरीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या जागेची रस्सीखेच सुरू असतानाच आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म मिळाला असल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे मुळीक समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ‘पिक्चर अभी बाकी है’ अशी भूमिका या समर्थकांनी घेतली आहे.

हडपसर मतदारसंघातही शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट पायी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी करण्यासाठी प्रयाण केले आहे. तत्पूर्वीच, आमदार चेतन तुपे यांना एबी फॉर्म मिळाला आहे, त्यामुळे शिवसैनिकांची केवळ पायपीटच होणार, असेच चित्र आहे.

महाविकास आघाडीचे इच्छुक सैरभैर

आठपैकी एकाही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाली नसल्याने इच्छुक सैरभैर झाले आहेत. त्यातच हडपसरच्या जागेवरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही, तर पर्वतीची जागा काँग्रेसला मिळणार की राष्ट्रवादी पवार गटाकडे कायम राहणार यासंबंधीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाला संधी दिली जाणार की आयात उमेदवार लादला जाणार, अशा चर्चा सुरू असतानाच वडगाव शेरी शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news