

पुणे : राज्याच्या सर्वच शहरांमधील हवेची गुणवत्ता चिंताजनक असल्याचा अहवाल हाती आला असून, पी.एम. 2.5 या अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर असल्याचा निष्कर्ष आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आठ वर्षांच्या आकडेवारीचा आधार घेत हे संशोधन करण्यात आले आहे.(Latest Pune News)
वातावरण फाउंडेशन आणि एनवायरो कॅटलिस्ट या दोन संस्थांनी जाहीर केला असून, राज्यातील हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस गंभीर वळण घेत आहे. ताज्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये निम्म्याहून अधिक शहरांमध्ये ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानक’ पेक्षा (एनएएक्यूएस) धूलिकणांची पातळी ( पी.एम.2.5) प्रमाणापेक्षा खूप जास्त आढळली आहे. सर्वच शहरांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त धूलिकण (पी. एम. 10) सूक्ष्म धूलिकण आढळून आले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रा’च्या सलग आठ वर्षांच्या आकडेवारीवर हा अहवाल आधारित असून, ऑक्टोबर ते फेबुवारी दरम्यान प्रदूषणात मोठी वाढ होते आणि फक्त पावसाळ्यात तात्पुरता दिलासा मिळतो.असा शेरा अहवालात नमूद करण्यात आला आहे.
(धुलिकण 2.5पी.एम)
शहर गुणवत्ता
मालेगाव 51
जालना 50
जळगाव 48
फचांगली हवा
सांगली 28 2.5
सांगली 75 10
(धुलिकण 10 पीएम)
शहर गुणवत्ता धुलीकण
जळगाव 110 10
(हिवाळ्यात जास्त)
हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचते, ज्यामुळे शारीरिक आरोग्य आणि कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
पावसाळ्यात तात्पुरता दिलासा: पावसाळ्याचे केवळ तीन महिने प्रदूषण कमी होते आणि त्यानंतर पातळी पुन्हा वाढते.
जळगाव, नवी मुंबई : गेल्या 5 वर्षांत पी.एम.10 ची पातळी जवळपास दुप्पट झाली आहे.
वायू प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नाही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. अहवालातून हे स्पष्ट होते की धोरणे अस्तित्वात आहेत, परंतु त्यांच्या अंमलबजावणीत विसंगती आढळते. अनेकदा ती राबविण्यासाठी विलंब होतो.
भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन, मुंबई
वायू प्रदूषणाची कमीत कमी पातळी देखील सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमध्ये धूलकणांची पातळी ‘एनएएक्यूएस’ पेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे आणि सर्व शहरांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहेत.
सुनील दहिया, संस्थापक, एनवायरो कॅटलिस्ट, मुंबई