

पुणे: बीएस्सी (ऑनर्स) वनशास्त्र आणि बीएफएस्सीच्या (मत्स्यविज्ञान) प्रवेशाच्या पात्रतेकरिता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषयांतील सामाईक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) गुण हे अतिरिक्त पात्रता निकष म्हणून पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ग््रााह्य धरावेत, अशी शिफारस महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत सोमवारी (दि. 18) करण्यात आली.
वनशास्त्र आणि मत्स्यविज्ञान या दोन पदव्यांसाठी सीईटीच्या फक्त भौतकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या ग््रुापचे (पीसीबी) गुणच प्रवेशासाठी ग््रााह्य धरले जात आहेत. ते पीसीएममधूनही सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुणही ग््रााह्य धरावेत, अशी शिफारस आहे. परिषदेचे अध्यक्ष व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी परिषदेच्या सभागृहात दुपारी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला उपाध्यक्ष तुषार पवार, सचिव परिमल सिंग, चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, महासंचालक राहुल महिवाल, आरती भोसले, रूपाली कोळी, डॉ. किशोर शिंदे, डॉ. विकास लोंढे, डॉ. प्रकाश सानप, मंगल कदम, अमोल बन्ने आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रस्तावित प्रवेश पात्रता
बीएस्सी (ऑनर्स) वनविद्या - इयत्ता 12 वी विज्ञान उत्तीर्ण किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र - पीसीएमबी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) किंवा इंटर - कृषी आणि इंग््राजीसह उत्तीर्ण. पात्रता परीक्षेत जीवशास्त्र/गणित हे विषय घेतले नसल्यास, अशा उमेदवारास अपूर्तता भरून काढण्यासाठी संबंधित विद्यापीठाने विहित केलेले अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील.