श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अकरा हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अकरा हजार शहाळ्यांचा महानैवेद्य
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरिता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शुक्रवारी मंदिरात पूजा, गणेशयाग व अभिषेक झाला. गाभार्‍यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. पहाटे डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर यांचा व्हायोलीनवादनाचा कार्यक्रम झाला. शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. दुसर्‍या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news