Bhor News: भोर तालुक्यात राजकीय उलथापालथ; जिल्हा परिषदेची नवी गटरचना जाहीर

भोंगवली-संगमनेर गटात मोठा फेरबदल
Zilla Parishad
भोर तालुक्यात राजकीय उलथापालथ; जिल्हा परिषदेची नवी गटरचना जाहीरPudhari
Published on
Updated on

भोर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गट - गणरचना जाहीर झाली आहे. प्रभाग रचनेतील बदलामुळे भोर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नव्या प्रभाग रचनेमुळे इच्छुक नेत्यांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.

पूर्वीच्या भोंगवलीड्ढसंगमनेर गटात या वेळी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. तांबाड, हातवे खुर्द आणि हातवे बुद्रुक ही गावे वेळू गटातील नसरापूर गणाला जोडण्यात आली आहेत. तर उंबरे, कामथडी आणि करंदी ही गावे वेळू गटातून काढून भोंगवली गटातील संगमनेर गणात समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये कामथडी गावची लोकसंख्या मोठी असल्याने संगमनेर गणाचे नाव बदलून ’कामथडी’ करण्यात आले आहे. (Latest Pune News)

Zilla Parishad
Hutatma Rajguru memorial: हुतात्मा राजगुरू स्मारकाचे काम रखडलेलेच; निधी मिळूनही वर्षापासून काम अपूर्णच

या बदलांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यावरून चर्चेला उधाण आले आहे. फेरबदल भौगोलिक गरज लक्षात घेऊन झाले नसून, काही विशिष्ट नेत्यांच्या दबावाखाली करण्यात आल्याचे काहींचे म्हणने आहे. काही गटांना लाभ व्हावा, तर काहींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त व्हावा, यासाठीच ही रचना करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, कामथडी गणाची निर्मिती हा स्थानिक प्रभावशाली नेत्यांचा विजय आहे. नसरापूर गणात तांबाड, हातवे खुर्द आणि हातवे बुद्रुक गावे गेल्याने येथील निवडणुकीचे गणित बदलणार आहे. त्यामुळे जुनी राजकीय समीकरणे बदलून नवी समीकरणे आकारास येण्याची शक्यता आहे.

भोर तालुक्यातील नवी गटरचना पुढील प्रमाणे

वेळू-नसरापूर गट - (नसरापूर गण) - देगाव, नायगाव, केळवडे, साळवडे, कुरुंगवडी, पारवडी, सोनवडी, सांगवी बु., कोळवडी, जांभळी, विरवाडी, केतकावणे निम्मे, दिडघर, खडकी, सांगवी खु., निधान, माळेगाव, नसरापूर, तांबाड, हातवे खु., हातवे बु.

वेळू गण - शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, कासुर्डी खे.बा., रांजे, कुसगाव, खोपी, शिवरे, वर्वे खु., वर्वे बु., कांबरे खे.बा., कांजळे.

भोंगवली- कामथडी गट - भोंगवली गण - निगडे, धांगवडी, किकवी, मोरवाडी, वागजवाडी, भोंगवली, पेंजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार हिंगे, न्हावी (315, 322), भांबवडे, राजापुर, पांडे, सावरदरे, सारोळे, केंजळ.

कामथडी गण - भिलावाडी, मोहरी बु., हरिश्चंद्री, दिवळे, कापुरोळ, मोहरी खु., तेलवडी, कासुर्डी गु.मा., आळंदे, भैरवनाथनगर आळंदेवाडी, इंगवली, संगमनेर, हरणस, लव्हेरी, नन्हे, ब—ाम्हणघर वेखो, माजगाव-जोगवडी, गोरड म्हसवली, उंबरे, कामथडी, करंदी.

भोलावडे-शिंद गट - भोलावडे गण - वाढाणे, करंदी बु., करंदी खु., कांबरे खु., कांबरे बु., कुरुंजी, मळे, गुहिणी, खुलशी, कुंबळे, बोपे, चांदवणे, भुतोंडे, डेरे, भांड्रवली, साळंगण, डेहेण, कोंडगाव, पांगारी, नानावळे, जयतपाड, नांदघूर, वेळवंड, राजघर, पसुरे, म्हाळवडी, कर्णवडी, बारे बु., बारे खु., किवत, बसरापूर, भोलावडे, सांगवी हिमा, येवली.

शिंद गण - गवडी, शिंद, नांद, महुडे खुर्द, ब—ाह्मणघर हिमा, महुडे बु., भानुसदरा, पिसावारे, वाठार हिमा, नांदगाव, आपटी, करंजगाव, कुंडघर, देवघर, म्हसर खुर्द, धामखंड बु., कोंढरी, हिंडोशी, कांबळी राजिवडी, आशिंपी, शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, शिरवली हिमा, कुडली खु., कुठली बु., गुढे, निवंगण, पहार खु., मेरी, पहार बु., धनिवली, दापकेघर.

Zilla Parishad
Stray dog attack: राजगुरुनगरात मोकाट कुत्र्याचा हल्ला; वकिलाला गंभीर दुखापत

उत्रोली-कारी गट - कारी गण - रायरी, भांबट माळ, साळव, भावेखल, अंगसुळे, सांगवी तर्फे भोर, कारी, कोर्ले, टीटेघर, वडतुंबी, शिवनगरी, म्हकोशी, चिखलगाव, आडाचीवाडी, धोंडेवाडी, रावडी, कर्णावड, कुडपणेवाडी, वावेघर, आंबवडे, नाझरे, पान्हवळ, चिखलावडे बु., चिखलावडे खु., आंबेघर, नाटंबी, करंजे.

उत्रौली गण - शिरवली तर्फे भोर, पोंम्बर्डी, वेनवडी, भाबवडी, हातनोशी, बाजारवाडी, धावडी, पळसोशी, पाले, वरोडी बु., वरोडी डायमुख, वरोडी खु., आंबाडे, कोळवडी, बालवडी, नेरे, निळकंठ, गोकवडी, खानापूर, उत्रोली,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news