Maharashtra Assembly Polls: पर्वती जतन, संवर्धनातून जपला वैभवशाली वारसा: आमदार मिसाळ

Pune Elections: मिसाळ यांच्या प्रचारात म्हाडा कॉलनी, पर्वती गाव, निलय सोसायटी, अरुणोदय सोसायटी, गजानन महाराज चौक परिसरात प्रचार फेरी झाली.
Madhuri Misal News
लक्ष्मीनगरमध्ये आमदार माधुरी मिसाळ यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.Pudhari
Published on
Updated on

Pune Politics: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या पर्वतीचे जतन आणि संवर्धन करून आपल्यला वैभवशाली वारसा आणि संस्कृती जपता आली. त्यासाठी राज्य शासनाचा विशेष निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती महायुतीच्या पर्वती मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.

मिसाळ यांच्या प्रचारात म्हाडा कॉलनी, पर्वती गाव, निलय सोसायटी, अरुणोदय सोसायटी, गजानन महाराज चौक परिसरात प्रचार फेरी झाली. या वेळी सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, विनोद वस्ते, शिवाजी गदादे पाटील, संजय शिंदे, मयूरेश चंद्रचूड, शैलेश लडकत, शिरीष देशपांडे, तेजस गाडे, राज ढवळकर, अजय जगताप, राजाभाऊ शेंडगे, लहू जागडे, राजेश तावडे यांचा प्रमुख सहभाग होता.

Madhuri Misal News
Maharashtra Elections: बागवेंना सर्वाधिक मताधिक्य देणार; आंबेडकरी कार्यकर्त्यांचा निर्धार

मिसाळ म्हणाल्या, श्री क्षेत्र देवदेवेश्वर संस्थान येथे विविध प्रकारची विकासकामे करून घेतली. पेशवेकालीन वस्तुसंग्रहालयाचे नूतनीकरण, मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे भित्तिचित्रांद्वारे प्रदर्शन, पेशवे-ब्रिटिश अधिकारी यांची भेट झालेल्या कॅफेचे नूतनीकरण, शूर मराठा सरदारांच्या स्मारकाचे सुशोभीकरण आदी विकासकामांचा समावेश आहे.

मिसाळ म्हणाल्या, कार्तिकेय स्वामी मंदिर परिसरात रस्ता, सीमाभिंत, पायर्‍या, रेलिंग आदी विकासकामे पूर्ण केली. विविध प्रकारच्या कला-सांस्कृतिक कामांसाठी अ‍ॅफिथिएटर आणि 25 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news