वेल्हे-हवेलीत लम्पी लसीकरणाला वेग

वेल्हे-हवेलीत लम्पी लसीकरणाला वेग
Published on
Updated on

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने वेल्हे तसेच हवेली तालुक्यात जनावरांच्या लम्पी लसीकरण वेगाने सुरू केले आहे. वेल्हे तालुक्यात लम्पीची लागण सुरू झाल्याने प्रशासनाने खेडोपाडी लसीकरण सुरू केले आहे. पानशेतसह तोरणा, वेल्हे भागात आतापर्यंत 3 हजार 178 जनावरांना लस देण्यात आली. वेल्हे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. भास्कर धुमाळ म्हणाले, गाई, बैल व वासरे अशा जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. धानेप येथे एका जनावराला लम्पीची लागण झाली होती.

त्यामुळे आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. हवेली तालुक्यातील खामगाव मावळ येथे लसीकरणाला सुरुवात झाली. खानापूर, सिंहगड मोगरवाडी, माळवाडी, चांदेवाडी आदी ठिकाणी बैल, गाय, वासरे अशा यांना 300 हून अधिक जनावरांना लस देण्यात आली.
हवेली तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. डब्ल्यू .व्ही. डबेटवार, खानापूर पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. डी. के. बेंद्रे, पी. ए. सोनार, एन. व्ही. मते, परीचर आणि डी. आर. दिवार, लक्ष्मण दारवटकर आदी लसीकरण मोहिमेत सहभागी झाले होते. जनावरांना मोफत लस देण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी लम्पी प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हवेलीचे पशुधन
विकास अधिकारी डॉ. डबेटवार यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news