लम्पीचा फैलाव; चाकणचा बैल बाजार बंद

लम्पीचा फैलाव; चाकणचा बैल बाजार बंद

चाकण : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातदेखील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लम्पी रोगाचा फैलाव होत आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनीदेखील जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चाकण येथील जनावरांचा बाजार शनिवारपासून (दि. 2) बंद राहणार असल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. केवळ गायवर्णीय बाजार बंद राहणार असून, म्हैस व शेळी बाजार सुरूच राहणार असल्याचे बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यात बहुतांश गायी आणि म्हशींमध्ये लम्पी रोगाची लक्षणे दिसत आहेत.

जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली, पुरंदर आणि मुळशी तालुक्यांत जनावरांची वाहतूक, बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. तसेच बैलगाडा शर्यतीवरही बंदी घालण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार चाकण जनावरांचा बाजार बंद ठेवण्याबाबतचा बाजार समिती प्रशासनाने निर्णय घेतला आहे. गाय-बैलांमधील लम्पीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारचा (दि. 2) गाय-बैलांचा बाजार बंद ठेवण्यात आलेला आहे. म्हैस व शेळी-मेंढी बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे व सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news