लोणावळा पोलिसांची भिस्त ट्रॉफिक वॉर्डनच्या खांद्यावर

लोणावळा पोलिसांची भिस्त ट्रॉफिक वॉर्डनच्या खांद्यावर
Published on
Updated on

लोणावळा : लोणावळा शहर पोलिस ठाण्यासाठी एकूण 97 पोलिस कर्मचारी मंजूर आहेत. मात्र, आजमितीला शहर पोलिस ठाण्यामध्ये 50 टक्क्यांहून कमी म्हणजे केवळ 47 पोलिस आहेत. यामध्येही 3 कर्मचारी आजारपणाच्या रजेवर असून 5 कर्मचारी सातत्याने गैरहजर आहेत. सध्या केवळ 39 पोलिस कर्तव्यावर हजर आहेत. त्यामुळे लोणावळा पोलिसांची भिस्त ट्रॉफिक वॉर्डनच्या खांद्यावर असल्याचे दिसत आहे.

यातीलही रोज 4 कर्मचार्‍यांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागते. म्हणजे लोणावळा पोलिस स्टेशनला दिवस आणि रात्र अशा दोन्ही शिफ्टसाठी केवळ 35 पोलिस उपलब्ध असतात. यातही वडगाव कारागृहात रोज 1 तर पोलीस प्रशिक्षण केंद्रात रोज 1 कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवायला लागतो. याशिवाय पोलीस खात्यात नेहमीच वेगवेगळे प्रशिक्षण कोर्स सुरू असतात, त्यासाठी सरासरी 2 कर्मचारी बाहेर असतात. न्यायालयाच्या रोजच्या कामासाठी 2, तर समन्स आणि वॉरंट बजावण्यासाठी 1 कर्मचारी द्यावा लागतो. वाहतूक नियंत्रणकामी 5 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे.

शिवाय पोलिस स्टेशनमध्ये रोजच्या रोज वायरलेस साठी 2 कर्मचारी, ठाणे अंमलदार म्हणून 2 कर्मचारी, सिसिटीएनएससाठी 2 कर्मचारी आवश्यक असतात. लोणावळा पोलीस स्टेशनला दोन सरकारी गाड्या तैनात आहे, मात्र चालक केवळ 1 आहे. याशिवाय कारकून, अधिकार्‍यांचे दफ्तरी, गोपनीय विभाग, बारनिशी, ड्युटी ऑफिसर, क्राईम टेबल तसेच खंडाळा, भांगरवाडी, रायवूड आणि तुंगार्ली या चार पोलीस आऊटपोस्टसाठी लागणार कर्मचारी वर्ग वगळता वेळोवेळी लागणारे बंदोबस्त, रोजचे पेट्रोलिंग, 112 चे कॉल अटेंड करणे यासाठी लागणारा कर्मचारीवर्ग कसा उपलब्ध केला जातो याचे उत्तर लोणावळा पोलिसांनाच माहिती. आशामध्ये लोणावळा नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या 12 ट्रॅफिक वॉर्डनवरच लोणावळा पोलिसांची संपूर्ण भिस्त असल्याचं दिसून येत आहे. मात्र अशा अप्रशिक्षित वॉर्डनच्या भरवशावर कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यात पोलिसदल कसे यशस्वी होणार याचंही उत्तर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीच देऊ शकतील.

17 कर्मचार्‍यांना वारीचा बंदोबस्त

शहरात पर्यटनाचा हंगाम सुरू होत आहे. अशात याठिकाणी अधिकचा पोषलस बंदोबस्त आवश्यक असताना 27 ते 30 जून दरम्यान वारी बंदोबस्तासाठी लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे 17 कर्मचारी मागविण्यात आले आहे. हे 17 कर्मचारी बंदोबस्तासाठी गेल्यावर उर्वरित 18 कर्मचार्‍यांच्या आणि 12 वॉर्डनच्या जीवावर लोणावळा पोलीस लोणावळ्यातील बंदोबस्त कसा पार पडणार आणि येथील कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राखणार याचं उत्तर नक्की देणार कोण?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news