लोणावळा पोलिसांकडून गावठी हातभट्टी उद्ध्वस्त

लोणावळा पोलिसांकडून गावठी हातभट्टी उद्ध्वस्त
Published on
Updated on

लोणावळा(पुणे) : लोणावळा उपविभागीय क्षेत्रातील लोणावळा, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव या भागात सुरू असलेल्या अवैध धंदे आणि बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेहरगाव हद्दीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हातभट्टीवर कारवाई करून 80 हजार रुपये किमतीचे 1600 लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे.

पोलिसांनी टाकला छापा

याप्रकरणी हवालदार केतन महादू तळपे यांनी फिर्याद दिली आहे. फरार आरोपी नेताराम धरम सिंग राठोड याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी 5.45 वाजता वेहेरगाव हद्दीतील कंजर भटवस्ती येथील माळ रानात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी नेताराम धरम सिंग राठोड (वय 40, रा. कांजार भटवस्ती, वेहेरगाव) हा त्याच्या घराजवळ बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार करताना पोलिसांना मिळून आला.

त्या वेळी त्याच्याकडे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे प्रत्येकी 200 लिटरच्या 8 प्लास्टिक ड्रममधून भरलेले एकूण 1600 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. या रसायनाची किंमत प्रत्येकी 50 रुपये लिट प्रमाणे एकूण 80 हजार रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा तपास गणेश होळकर करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news