LokSabha Elections : मतदान केंद्र शोधण्यासाठी हेल्पलाइन : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

LokSabha Elections : मतदान केंद्र शोधण्यासाठी हेल्पलाइन : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी या भागातील नागरिकांना मतदान केंद्र शोधण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही महापालिका आयुक्तांनी त्यांच्या भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ. दिवसे म्हणाले, पुणे जिल्ह्यात शहरी भागात मतदान कमी होत असल्याने मतदानाची सरासरी टक्केवारी कमी दिसते. यंदा लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदान कमी असणार्‍या ठिकाणी अधिकाधिक मतदानाबाबत जनजागृती करावी, शहरी भागातील मतदारांना त्यांचे मतदान केंद्र समजण्यासाठी मनो युवर पोलिंग स्टेशनफ या नावाने मदतवाहिनी सुरू करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना दोन्ही महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. या मदतवाहिनीवर नागरिकांना त्यांचे मतदान केंद्र शोधून देण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडूनही शहरी भागात मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, रविवारपर्यंत (7 मार्च) शहरासह जिल्ह्यातील मतदारांची संख्या 82 लाख 92 हजार 951 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 8382 मतदान केंद्रे लोकसभा निवडणुकीसाठी निश्चित केली आहेत. बारामती मतदारसंघातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघांतील नागरिकांना 9 एप्रिल, तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघांतील नागरिकांना 15 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करण्याची संधी आहे, असे डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले.

मतदान वाढविण्यासाठी पुणे पॅटर्न राज्यभर

शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पुण्यात सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित केल्यास मतदानाचा टक्का वाढेल, त्यानुसार निवडणूक आयोगाला प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला आयोगाने मान्यता दिली असून, हा मपॅटर्नफ राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरीमध्ये सात, कोथरूडमध्ये आठ, खडकवासल्यात 15 आणि भोरमध्ये पाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news