Loksabha election | आता करा सोसायटीतच मतदान; काय आहे योजना?

Loksabha election | आता करा सोसायटीतच मतदान; काय आहे योजना?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : घरापासून दूर असलेले मतदान केंद्र आणि त्याठिकाणी लागणार्‍या रांगा त्यामुळे मतदार मतदानाकडे पाठ फिरवत असतो. त्यामुळे सोसायटीतील मतदारांना घराजवळच मतदान करता यावे, यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रथमच गृहनिर्माण सोसायटींमध्येच मतदान केंद्रे तयार केली आहेत. त्यात बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघांतील 35 मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे येथील मतदारांना मतदानासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. सोसायटीच्या आवारातच मतदान करता येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत केवळ शाळा, महाविद्यालय, समाज मंदिरांमध्ये होते. आता राज्यात गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यात पुणे शहरातील 35 सोसायटीत मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघातील 35 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामधील 35 हजार मतदारांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील 151 ते 155 क्रमांकाचे मतदान केंद्र विश्रांतवाडी येथील कस्तुरबा हौसिंग सोसायटीमध्ये तयार करण्यात आले आहेत.

त्यामुळे येथील साडेतीन हजार मतदारांना घराच्या खालीच मतदान करता येणार आहे. जुना मुंढवा येथील सिल्व्हर क्रेसिंत सोसायटीमध्ये 174 ते 275 क्रमांकाचे दोन मतदान केंद्र आहेत. कोथरूडमधील शेफालिका हाईट्स सोसायटीमध्ये 190 ते 194 क्रमांकाची पाच मतदान केंद्रे असून, त्याठिकाणी 5 हजार मतदारांना सोसायटीमध्येच मतदान करता येणार आहे. त्याबरोबरच पीएमसी हॅपी कॉलनी सभागृहात 324 ते 325 क्रमांकाचे तीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील 13 मतदान केंद्रे तयार करण्यात आली. त्यात वारजेतील रामनगर हौसिंग सोसायटीमध्ये 103 ते 105 क्रमांकापर्यंतचे सहा मतदान केंद्रांतील पाच हजार मतदारांना सोसायटीच्या सभागृहातच मतदान करता येईल. धनकवडीतील ध्येयपूर्ती सह. गृहरचना सोसायटीच्या हॉलमध्ये 192 आणि 193 क्रमांकाचे मतदान केंद्र आहेत. धनकवडीतील रक्षा लेखा सह. गृहरचना सोसायटीमध्ये 249 क्रमांकाचे मतदान केंद्र असणार आहे. सनसिटीमधील 295 क्रमांकाचे मतदान केंद्र सर्व्हे नं. 10 येथे उभारण्यात आले आहे.

डीएसके विश्वमध्ये मतदानाची सोय

डीएसके विश्व धायरीतील वरुण पवन सोसायटीमध्ये 385 ते 387 क्रमांकाची तीन मतदान केंद्रे आहेत. त्या ठिकाणी सुमारे तीन हजार 897 मतदार आहेत. डीएसकेतील वसुधा सोसायटीमध्ये 388 क्रमांकाचे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. डीएसकेतील सप्तसूर सोसायटीतील डीएसकडे हॉलमध्ये 389 क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. भोर विधानसभा मतदार संघातील ब्लूरीज पब्लिक स्कूल, हिंजवडी येथे 49 ते 53 क्रमांकाचे मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी साडेपाच हजार मतदारांना मतदान करता येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news