Loksabha election | बारामती लोकसभेत विजय शिवतारे कमळ फुलवण्यास तयार

Loksabha election | बारामती लोकसभेत विजय शिवतारे कमळ फुलवण्यास तयार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामतीची जागा मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. धनुष-बाणावर लढायला मी तयार आहे. लोकसभा मतदारसंघ भाजपने घ्यावा आणि भाजपकडून कमळ चिन्हावर बारामतीमधून निवडणूक लढण्यास मी तयार आहे. राज्यात अशा प्रकारची अदलाबदल इतर मतदारसंघांत सुरू असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
पुण्यामध्ये शिवतारे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपकडून कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास मी तयार आहे. मात्र, घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणार नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवार हेदेखील मला स्वीकारणार नाहीत आणि माझीही तयारी नाही. पक्षशिस्तीपेक्षा मला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणे महत्त्वाचे वाटते. त्यासाठी पक्षाची चौकट मोडावी लागली, तरी माझा निर्णय अंतिम आहे आणि बारामतीमधून निवडणूक लढविणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्याविरुद्ध प्रचंड रोष आहे. हेवेदावे न ठेवता मला उमेदवारी द्यावी, नाहीतर अपक्ष आहेच. मुख्यमंत्र्यांच्या घरातील मी माणूस आहे. माझ्यामुळे त्रास होतो आहे, याची मला खंत आहे. आम्ही आता गुलाम नाही. किती वर्षे मतदान करीत राहायचे, मी स्वतःहून राजीनामा देणार नाही. काही अडचण आली तर देईल, कारवाई करायची असेल तर करूद्या. अजित पवार हे फक्त काकांच्या जिवावर मोठे झाले, त्यांची अवस्था निवडणुकीनंतर कळेल.
– विजय शिवतारे, माजी राज्यमंत्री
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news