Loksabha Election | यंदा आम्ही लोकसभेचे खाते उघडू; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा विश्वास

Loksabha Election | यंदा आम्ही लोकसभेचे खाते उघडू; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा विश्वास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'वंचित'साठी यंदा सकारात्मक वातावरण असून, यंदा आम्ही लोकसभेचे खाते नक्की उघडू, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराची सुरुवात सोमवारी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित करण्यात आली. त्यानिमित्त सोमवारी पानमळा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाचे कर्ज वाढले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती प्रभाकरन 10 दिवसांपूर्वी म्हणाले की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संपेल. निवडणुका होणार नाहीत. संविधान संपेल.
सुप्रिया सुळेंना पाठिंबा सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आम्हाला भेटून विनंती केल्यामुळे आम्ही बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिला. त्या ठिकाणी आमचा उमेदवार दिला नाही.

सुप्रिया सुळेंना पाठिंबा

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आम्हाला भेटून विनंती केल्यामुळे आम्ही बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिला. त्या ठिकाणी आमचा उमेदवार दिला नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news