Loksabha election | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रॅलीला जेजुरीत मोठा प्रतिसाद!

Loksabha election | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रॅलीला जेजुरीत मोठा प्रतिसाद!

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार व घटक पक्षाने काढलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, मनसे व घटक पक्षाच्या वतीने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 4) रात्री 8 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅली काढण्यात आली. मुख्य रस्त्यावरून ही रॅली नंदी चौकात आली. जेजुरी गडाच्या पायथ्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीखंडोबाचे दर्शन घेतले.

रॅलीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, भाजपचे जालिंदर कामठे, बाबा जाधवराव, नीलेश जगताप, उत्तम धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक तानाजी जगताप, शिवसेनेचे मनोहर भापकर, विठ्ठल सोनवणे, भाजपाचे सचिन पेशवे, गणेश भोसले, अलका शिंदे, राष्ट्रवादीच्या अमृता घोणे, लता दोडके, वंदना जगताप, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, मोहन महाजन, गणेश निकुडे, रमेश बयास, देवसंस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे, राजेंद्र दरेकर, रिपाइंचे गौतम भालेराव, मनसेचे उमेश जगताप आदी उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news