प्रत्येक गोष्टीचा हिशेब द्यावा लागणार आहे. व्यवहार करत असताना बँकेचे अधिकारी आणि संबंधित अधिकार्यांनी रोख रकमेची आणि व्यवहाराची पारदर्शकपणे पडताळणी करावी. चुकीचे आढळल्यास तत्काळ कारवाई करावी.
– डॉ. सुहास दिवसे, निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पुणे
आचारसंहितेच्या काळात सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे. प्रचार सभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते. धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचे आवाहन करू नये.
– अजय मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी, शिरूर लोकसभा