Loksabha election 2024 : बारामतीसाठी पाच हजार अतिरिक्त मतदान यंत्र

Loksabha election 2024 : बारामतीसाठी पाच हजार अतिरिक्त मतदान यंत्र

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या 38 वर गेल्याने प्रशासनाला जास्त काम करण्याची वेळ आली आहे. उमेदवार वाढल्याने तीन मतदान यंत्रांचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक अतिरिक्त 5 हजार 489 मशिन देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने बारामती लोकसभा मतदारसंघाला सुरुवातीला 3569 इतक्या मशिन दिल्या होत्या. मात्र, जादा उमेदवारांमुळे 5489 इतकी अतिरिक्त मशीन यंत्रे बारामती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सुपूर्त केली आहेत. त्यामुळे बारामतीसाठी एकूण 9058 इतक्या मशिन उपलब्ध झाल्या आहेत. बारामती मतदारसंघात 2516 मतदान केंद्रे असून, 7548 इतक्या मशिन लागणार आहेत. त्यात 20 टक्के अतिरिक्त मशिन अशा 9 हजार 58 इतक्या मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

बारामतीसाठी आता अतिरिक्त मशिनसह एकूण नऊ हजार 58 एवढी मतदान यंत्रे वापरली जाणार आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. बारामतीमध्ये 38 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. परिणामी, उमेदवारांची संख्या 16 पेक्षा जास्त राहिल्याने मतदान यंत्राची संख्या वाढविण्याची वेळ आली. बारामती प्रमाणे पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतही 15 पेक्षा जास्त उमेदवार कायम राहिल्यास या तीनही मतदारसंघांसाठी अतिरिक्त मशिन लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे 21 हजार 202 इतकी मतदान यंत्रे होती. त्यापैकी चारही लोकसभा मतदारसंघांना एका यंत्राप्रमाणे सुमारे 11, 898 इतकी यंत्रे वाटण्यात आली आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news