

इंदापूर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लिक्विड अमोनिया वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना आज पहाटे घडली आहे. इंदापूर बाह्य वळणावरील व्यवहारे पेट्रोलियम समोर आज पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. टँकरमधील एक जण जखमी झाला असून त्याला इंदापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.Latest Pune News)
अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस, नगर परिषदेची अग्निशामक यंत्रणा आणि सरडेवाडी टोल कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून टँकरवर पाण्याचे फवारे मारण्यात आले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.