

आशिष देशमुख
पुणे: मे महिन्यात राज्यात अतिवृष्टी होताच जूनमध्ये बहुतांश भागात खूप कमी झाला आहे. राज्यातील 36 पैकी 31 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात 37 टक्के तर कोकणात 16 टक्के अधिक पाऊस झाला.
पालघर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नंदुरबार या पाच जिल्ह्यांतच अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. मान्सून यंदा मुंबई, पुणे याच ठिकाणी 13 दिवस अडखळल्याने मराठवाडा अन् विदर्भात कमी पाऊस झाला, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Latest Pune News)
यंदा राज्यात मेमध्ये अवकाळी पाऊस अतिमुसळधार म्हणजे 300 टक्के अधिक झाला. गत 60 वर्षांत राज्यात असा पाऊस या आधी झाला नाही. त्या पाठोपाठ मान्सून यंदा 22 मे रोजी तळकोकणात तर मुंबई, पुण्यात 25 आणि 26 जून रोजी दाखल झाला. मात्र, तो 13 दिवस याच भागात अडखळला. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे 30 जूनअखेर राज्यातील 36 पैकी 31 जिल्ह्यांत तुटीचा पाऊस झाला.
ठळक मुद्दे : (पाऊस : मि.मी.)
महाराष्ट्र एकूण : सरासरीपेक्षा सात टक्के अधिक (सरासरी ः 199.9 , पडलाः 213.8) कोकणः सरासरीपेक्षा 15 टक्के अधिक (सरासरी ः764.8,पडला ः 663.6) मध्य व उत्तर महाराष्ट्रः सरासरी 37 टक्के अधिक (सरासरी ः 266.7, पडलाः 150.7) मराठवाडा ः सरासरीपेक्षा 40 टक्के कमी
यंदा कोकणासह मुंबई, पुणे शहरात मान्सून खूप लवकर म्हणजे मे महिन्यातच आला. त्यामुळे या भागात मान्सून भरपूर बरसला. त्या उलट तो मुंबई, पुणे या भागात सुमारे 13 दिवस अडखळला. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात जाण्यास उशीर झाला. त्यामुळे या भागात खूपच कमी पाऊस झाला. आता जुलै महिन्याची सुरुवात चांगली होणार आहे. बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली तयार होत आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
- डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ज्ञ, पुणे