कांद्यासह सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची हटवा, शेतीमालास आधारभूत किंमत द्या, दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची अट रद्द करा, शेतीसाठी दिवसा विद्युतपुरवठा मोफत करावा, मनरेगाचा 80 टक्के निधी कृषी कामांशी जोडावा, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी करा, उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्या, विमा कंपन्या निवडण्याचा अधिकार शेतकर्यांना द्या, अफू शेतीचा परवाना सर्व जिल्ह्यांना द्या, जी.एम. बियाण्यांच्या वापरास परवानगी द्यावी, गाईच्या दुधाला प्रतिलिटरला 60, तर म्हशीच्या दुधास 100 रुपये हमीभाव मिळावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.