Leopards Story : शिकार की नसबंदी, याबाबत मत-मतांतरे

file photo
file photo
पुणे : बिबट्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी त्याच्या  शिकारीला परवानगी द्यावी  की त्यांची नसबंदी, याबाबत पर्यावरण तज्ज्ञ व वनाधिकार्‍यांत  मतमतांतरे आहेत.  वन विभागाचे अधिकारी म्हणतात, बिबट्यांना माणसाइतकाच जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांची शिकार करू नये, नसबंदी करायला  हरकत नाही. मात्र, पर्यावरणतज्ज्ञांचा नसबंदीला विरोध आहे. ते म्हणतात नसबंदी  महागडी असून, बिबट्या अत्यंत चपळ असल्याने ते शक्य होणार नाही.
दै. 'पुढारी'ने  बिबट्यांची वाढलेली संख्या आणि त्यावरील उपाययोजना, याबाबत तज्ज्ञांशी बोलून  त्यांची नेमकी मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे लक्षात आले की, या तज्ज्ञांमध्ये बिबट्यांच्या शिकारीला परवानगी द्यावी की नसबंदी करावी, याबाबत मत-मतांतरे आढळून आली.  वन विभागाचे  अधिकारी म्हणतात की, बिबट्याला देखील माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. जंगलात, शेतात किंवा शहरात बिबट्या जर आला, तर त्याला शत्र्रू न समजता  त्याच्यापासून आपण सावध राहून जगू शकतो.
इथे आता वाढते हत्तीगवत, उसाचे  वाढते क्षेत्र, या गोष्टींमुळे  सहज मिळणारे पशुधन हेदेखील एक कारण आहे.  जुन्नर भागामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अतिशय दाट झाडी आहे. ती आम्ही कमी  करण्याचा प्रयत्न करतो आहोत. रस्त्याच्या बाजूने जाताना दूरवरचे दिसेल, याची  काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, प्रत्येक घराजवळ थोडासा का होईना ऊस लावलेला  असतो तर ते प्रमाण आता कमी करावे लागेल. घराजवळ उसाची शेती नको, तसेच  घराच्या परिसरामध्ये हत्तीगवत लावलेले नको, हत्तीगवत असेल तर बिबट्या तिथे लपून बसू शकतो, उसातही लपून बसू शकतो. त्यामुळे घराजवळ ऊस आणि हत्तीगवत हे लावणे
टाळले पाहिजे.
 बिबट्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जुन्नरसारख्या भागात तर त्याची मोजदाद नाही. जंगलातील त्यांची गणना काही प्रमाणात शक्य आहे. परंतु, जो बिबट्या जंगल सोडून गावात, शेतात आला आहे, त्याची मोजणी कशी करणाऱ? तो एक मोठा संशोधनाचा विषय आहे. तो अत्यंत चपळ प्राणी असल्याने त्याला पकडणे शक्य नाही. त्यामुळे पकडून त्याची नसबंदी करणे, हे अशक्यप्राय वाटते. नसबंदी करायची ठरवली तरी ते अत्यंत महागडे प्रकरण आहे. त्यामुळे बिबट्यांची अंशतः शिकार हाच त्यांची संख्या कमी करण्यावर किंवा त्यांच्या संख्येत मर्यादा घालण्यासाठी उपाय असू शकतो, असे माझे स्पष्ट मत आहे, मी माझ्या पुस्तकांमधूनही हा पर्याय शासनाला वारंवार सुचविला आहे. बिबट्यांची नसबंदी शक्य नाही, हे मी वारंवार सांगतोय. पण, कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. माणसांवर हल्ले होत असतील तर नरभक्षक बिबट्यांची शिकार हाच पर्याय आहे. त्यामुळे गावात हल्ले होत असतील तर अंशतः शिकारीला परवानी दिली पाहिजे. –
डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ
माणसावर  हल्ला केला तर आम्हाला तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करावा  लागतो. त्यानंतर त्या बिबट्याचा शोध घेतला जातो. तो सापडलाच तर त्याला रेस्क्यू केंद्रामध्ये आणावे लागते. बिबट्या आणि जखमी माणूस यांची काळजी  घ्यावी लागते. बिबट्यांची नसबंदी हाच योग्य पर्याय वाटतो.
– प्रदीप चव्हाण वनाधिकारी, जुन्नर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news