तळेगाव ढमढेरेत धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

तळेगाव ढमढेरेत धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
Published on
Updated on

तळेगाव ढमढेरे(ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असून, नागरिकांवर हल्लेही वाढले आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. त्यातच शुक्रवारी (दि. 2) वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात एक बिबट्या जेरबंद झाला आहे. आठवडाभरात हा दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, परिसरात आणखीही बिबटे फिरत असल्याची चर्चा असल्याने वन विभागाने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तळेगाव ढमढेरे येथील चौधरीवस्ती, ढमढेरेवस्ती, भीमाशेत, साळूमाळूवस्ती परिसरात बिबट्यांनी काही जनावरांचा फडशा पाडलेला आहे. एका दुचाकीस्वारावर देखील झडप मारली आहे. त्यामुळे वन विभागाने परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात दि. 21 मे रोजी एक बिबट्या अडकला. त्यानंतर पुन्हा नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाने तेथेच पिंजरा लावला. त्यात शुक्रवारी (दि. 2) सकाळच्या सुमारास बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे नागरिकांना दिसले. बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना देण्यात आली. त्यानुसार वनपाल गौरी हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रमोद पाटील, शिरूर वन विभाग रेस्क्यू टीमचे सदस्य व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, पोलिस हवालदार किशोर तेलंग यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news