Leopard News : धायरी परिसरात बिबट्याने पाडला 3 जनावरांचा फडशा

file photo
file photo

खडकवासला : धायरी, नांदोशी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. एकट्या धायरी येथे बिबट्याने तीन गायी-वासरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे जंगलालगतच्या वस्त्यांतील शेतकरी, गुराख्यांत दहशत पसरली आहे. धायरीच्या डोंगरमाथ्यापर्यंत लोकवस्त्यांचा विस्तार झाला आहे. जवळच वन विभागाचे वनक्षेत्र आहे. खंडोबा डोंगर, म्हसोबा दर्‍यापासून नांदोशी ते सिंहगड किल्ल्यापर्यंत असलेल्या वनक्षेत्रात बिबट्याचा अधिवास आहे.

त्यामुळे भाविक, ट्रेकर्स, शेतकरी, गुराख्यांनी वनक्षेत्रात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. दरम्यान, पुणे (भांबुर्डा) वन विभागाचे वनपरिमंडलाधिकारी सचिन सकपाळ यांच्या पथकाने बिबट्याने फडशा पाडलेल्या एका बैलाचा आज पंचनामा केला. याबाबत राहुल पोकळे, पांडुरंग सुपेकर व शेतकर्‍यांनी उपवनसंरक्षकांना निवेदन दिले आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी त्यात केली आहे.

धायरी येथील म्हसोबा दरा, धनगरवस्ती खंडोबा डोंगर परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. नवनाथ भागूजी कचरे, श्रीरंग दत्तात्रेय पोकळे, किसन आखाडे यांची गायी, वासरे अशा तीन जनावरांचा बिबट्याने आतापर्यंत फडशा पाडला आहे. वन विभागाने शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी.

– राहुल पोकळे, अध्यक्ष, राष्ट्रसेवा समूह

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news