पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड येथील चिखली परिसरात गुरुवारी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. सुदैवाने बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही. वन विभागाच्या रेस्क्यू टिमने चार तासांत बिबट्याला जेरबंद केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निः श्वास टाकला.
चिखली परिसरात पहाटे साडेपाचच्या दरम्यान नागरिकांना बिबट्या दिसला. याची माहिती समजताच वन विभागाची रेस्क्यू टीम अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत पोहोचली. वन्य विभाग, पोलिस आणि महापालिका कर्मचारी यांनी मिळून बिबट्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला बिबट्या वस्तीतच होता. तिथून एका गोठ्यात गेला आणि तिथून एका बंगल्याच्या समोर गेला. त्याठिकाणी ज्वारीचे शेत होते. त्या शेतात तो बराच वेळ थांबला होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.
बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम आहे. वन विभागाकडून रेस्क्यू टीममधील कर्मचार्यांना – जॅकेट्स, हेल्मेट, शिल्ड, पिंजरा, जाळी देण्यात येते. बिबट्या दिसला की त्याचा र स्वभाव कसा आहे ते पाहिले जाते. त्यानुसार, त्याला पकडण्याचे काम केले जाते. न त्यानंतर इंजेक्शनने बेशुद्ध करायचे की नाही हे ठरविले जाते.
बिबट्याला पकडण्यासाठी टायगर सेल म्हणून आम्ही ग्रुप तयार केला आहे. त्यानुसार, आम्ही सर्व टीम काम करत असतो. चिखली येथे पहाटे नागरिकांना बिबट्या दिसला होता. आम्ही अर्धा तासात तेथे पोहोचलो. त्याला सकाळी १० वाजता पकडले. बिबट्याला इंजेक्शनने बेशुद्ध करून पकडण्यात आले. तो शुद्धीवर असून, सुखरूप आहे.
– दीपक पवार, सहायक वनसंरक्षक, पुणे विभाग
हेही वाचा