आवक वाढल्याने लिंबू स्वस्त; किरकोळ बाजारात दहा रुपयांना तीन नग

आवक वाढल्याने लिंबू स्वस्त; किरकोळ बाजारात दहा रुपयांना तीन नग

पुणे : अवकाळी पावसामुळे लिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात लिंबे उपलब्ध होत आहे. उन्हाचा चटका कायम असल्याने लिंबांना रसवंतीगृहे, सरबत विक्रेते यांच्याकडून चांगली मागणी आहे. बाजारात दाखल होत असलेल्या लिंबांच्या तुलनेत मागणी नसल्याने 15 किलोंच्या गोणीमागे भाव शंभर रुपयांनी उतरले आहेत.

किरकोळ बाजारात दहा रुपयांना तीन याप्रमाणे लिंबाची विक्री सुरू आहे. फळबाजारात कलिंगड, खरबूज, पपई व डाळींब आदी रसदार फळांना चांगली मागणी आहे. बाजारात दाखल होत असलेल्या फळांच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने कलिंगड, खरबूज व पपईच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपये तर डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असून दर टिकून आहेत.

रविवारी (दि. 7) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 7 ट्रक, मोसंबी 10 ते 15 टन, डाळिंब 35 ते 40 टन, पपई 7 ते 8 टेम्पो, लिंबांची सुमारे दोन ते अडीच हजार गोणी, कलिंगड 3 ते 4 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, पेरू 50 क्रेट्स, चिक्कू एक हजार डाग, हापूस आंबा अडीच ते तीन हजार पेटी, कर्नाटक आंब्याची तीस हजार पेटी व बॉक्सची आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 500-1000, मोसंबी : (3 डझन) : 250-400, (4 डझन) : 100-250, संत्रा : (10किलो) : 300-1500, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 20-130, गणेश : 5-30, आरक्ता 10-40, कलिंगड : 8-14, खरबूज : 15-22, पपई : 7-15, अननस (एक डझन) : 100-500, पेरू (वीस किलो) : 250-400, चिक्कू (दहा किलो) : 100-300, अंजीर (1 किलो) : 20-100, आंबा : रत्नागिरी हापूस : कच्चा 5 ते 9 डझन : 2500-4500 तयार 3000-5000. कर्नाटक : कच्चा हापूस (1 डझन) 300-500 (1 किलो) 60-80, पायरी (1 डझन) 250-350 (1 किलो) 30-50, लालबाग (1 किलो) 30-40, बदाम/बैगनपल्ली (1 किलो) 30-40.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news