

पुणे: ओबीसी आरक्षणासाठी दिवस-रात्र झटत आहे. मात्र, काही जणांकडून त्यांची बदनामी करण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. जर काही चुकीचे केले असेल, तर अटक करून जेलमध्ये टाका, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रविवारी सांगितले.
लक्ष्मण हाके यांना पैशाची ऑफर देण्याच्या बहाण्याने फोन करून शिवीगाळ करण्यात आल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीने आंदोलनासाठी यूपीआयच्या माध्यमातून एक लाख रुपये पाठविण्याची ऑफर दिली होती. (Latest Pune News)
या प्रकरणामुळे हाके यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती; त्याला हाके यांनी उत्तर दिले आहे. हाके म्हणाले, मला बदनाम करण्याचे प्रत्येक प्रयत्न केले जात आहेत. ओबीसी आंदोलनासाठी मी रात्रंदिवस झटत आहे.
काही जण उदात्त हेतूने मदत करीत आहेत. परंतु, अशाच प्रकारे मदत करायचे, असे सांगणारी व्यक्ती फोन करून माझा यूपीआय आणि गुगल पे नंबर मागते. मी ते वापरत नसल्याचे सांगितले, तरीही मी एक नंबर दिला आणि त्याच्याशी बोलायला सांगितले.
त्या नंबरची ईडीकडून चौकशी करून तपास करावा; जर पैसे घेतले गेले असतील तर त्यांना अटक करून जेलमध्ये टाका. अशा प्रकारे ओबीसीला लक्ष्य केले जात आहे. मी मदत नाकारली तरीही आग््राह केला गेला आणि नंतर कॉल रेकॉर्ड केला गेला. याचा उद्देश मला बदनाम करणे आहे, असेही हाके यांनी म्हटले आहे.