Pune Ward structure objections: प्रभागरचनेवर हरकती, सूचनांसाठी अखेरचे दोन दिवस; एका दिवसात 785 हरकती दाखल

आत्तापर्यंत प्रारूप प्रभागांवर 1 हजार 382 हरकती
Pune Municipal Corporation
प्रभागरचनेवर हरकती, सूचनांसाठी अखेरचे दोन दिवस; एका दिवसात 785 हरकती दाखलPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती-सूचना नोंदविण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले असून, गुरुवारी (दि. 5) अंतिम मुदत आहे. तर, आत्तापर्यंत या प्रारूप प्रभागांवर 1 हजार 382 हरकती आणि सूचना आल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवसात 785 हरकती दाखल झाल्या आहेत.

महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभागरचना प्रशासनाने दि. 22 ऑगस्टला जाहीर केली आहे. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. 4 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. एकीकडे ही प्रभागरचना करताना मोठ्या प्रमाणावर नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. (Latest Pune News)

Pune Municipal Corporation
Heavy rain Marathwada: मराठवाड्यात 20 वर्षांनंतर अतिवृष्टी; बीड, लातूर, नांदेडमध्ये दहा दिवसांंत दोनवेळा पूरस्थिती

त्यावरून सत्ताधारी भाजपवर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. तर महाविकास आघाडीकडून थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे मात्र गेल्या दहा दिवसांत जेमतेम 1 हजार 385 एवढ्याच हरकती-सूचना आल्या आहेत.

प्रामुख्याने गेल्या सात दिवसांपासून शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरुवात असल्याने हरकती-सूचनांच्या प्रक्रियेकडे कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता हरकती-सूचना नोंदविण्यासाठी आता अखेरचे दोन दिवसांची संधी शिल्लक राहिली आहे.

Pune Municipal Corporation
Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्राला तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

एकही हरकत नसलेले प्रभाग

प्रभाग 5 कल्याणी नगर ड्ढ वडगावशेरी, प्रभाग 10 बावधन ड्ढ भुसारी कॉलनी, प्रभाग 12 छत्रपती शिवाजीनगर ड्ढ मॉडेल कॉलनी, प्रभाग 25 शनिवार पेठ ड्ढ महात्मा फुले मंडई, प्रभाग 29 डेक्कन जिमखाना ड्ढ हॅपी कॉलनी, प्रभाग 30 कर्वेनगर ड्ढ हिंगणे होम कॉलनी, प्रभाग 31 मयूर कॉलनी ड्ढ कोथरूड, प्रभाग 40 कोंढवा बुद्रुक ड्ढ येवलेवाडी याचा समावेश आहे.

सर्वाधिक हरकती विमानगर-लोहगाव प्रभागात

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक 3 विमाननगर लोहगावमध्ये 381 हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्याखालोखाल प्रभाग 34 नर्‍हे ड्ढ वडगाव बुद्रुकमध्ये 278 आणि प्रभाग 15 मांजरी बुद्रुक-साडेसतरा नळीमध्ये 224 हरकती सूचना आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news