पुणे : कुसगाव खिंड रस्त्याचे काम निकृष्ट

पुणे : कुसगाव खिंड रस्त्याचे काम निकृष्ट

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  वेल्हे, भोर व हवेली तालुक्यातील गावे जवळच्या अंतराने जोडणार्‍या करंजावणे ते शिवापूर रस्त्याचे कुसगाव खिंडीतील काम मंदगतीने सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सिंहगड, राजगड असे गडकोट तसेच श्री मळाईदेवी व इतर देवस्थाने या भागात आहेत. जवळचे अंतर असल्याने पर्यटकांसह विद्यार्थी, कामगार, दूध व्यावसायिकांची या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. अनेक वर्षांपासून कंरजावणे ते शिवापूर रस्त्यासाठी लाखो  रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे.

सध्या जवळपास पाच कोटी रुपये खर्च करून पाच किलोमीटर अंतराचा रस्ता तसेच कुसखिंड रस्त्याचे काम सुरू आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी मांगडे यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. मांगडे म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून संथगतीने काम सुरू आहे. कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. दोन्ही बाजूला गटारे व साईड पट्ट्या नाहीत. मुरुमाला पाणी न मारता रोलींग केले जात आहे. त्यामुळे खडी व मुरुम तसाच आहे. चांगल्या दर्जाचे काम न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजित वेळेत चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news