Kurkumbh MIDC Chemical Seized: कुरकुंभ एमआयडीसीत मोठी कारवाई; विषारी दारूनिर्मितीच्या संशयावरून ५८०० लिटर रसायन जप्त

समर्थ लॅबवर अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स व पुणे ग्रामीण पोलिसांचा छापा; बेकायदेशीर मद्यनिर्मितीच्या शक्यतेने तपासाला वेग
Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Kurkumbh MIDC Toxic Liquor FactoryPudhari
Published on
Updated on

विनोद गायकवाड

पांढरेवाडी: अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीतील समर्थ लॅब या कंपनीवर टाकलेल्या धाडीत कथितपणे विषारी दारूनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा मोठा साठा उघडकीस आणला आहे.

Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Ghodagaon Police: घोडेगाव पोलिसांच्या तपासाला यश; चार गुन्ह्यांत ८ आरोपींना न्यायालयाची शिक्षा

या कारवाईत सुमारे ५ हजार ८०० लिटर रसायन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण कुरकुंभ एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून, औद्योगिक क्षेत्रातील बेकायदेशीर कारवायांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Junnar Leopard Capured: जुन्नरच्या बोरी गावात बिबट्या जेरबंद; जाधववाडी परिसरातील नागरिकांना दिलासा

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, समर्थ लॅबमध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद रसायनांची साठवणूक आणि प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता विविध रसायने, उत्पादनासाठी वापरली जाणारी उपकरणे तसेच मोठ्या प्रमाणातील केमिकलचा साठा आढळून आला. प्राथमिक तपासात या रसायनांचा वापर बेकायदेशीर मद्यनिर्मितीसाठी होणार असल्याचे उघडकीस आले आहे.

Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Baramati Artificial Milk Case: बारामतीत कृत्रिम दूध निर्मितीचा संशय; साहित्य साठा जप्त, आठ जणांवर गुन्हा दाखल

तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार या रसायनांपासून लाखो लिटर बनावट किंवा विषारी दारू तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रसायनांचा पुरवठा कुठून होत होता, तयार होणारे उत्पादन कुठे पाठविले जात होते, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.

Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत ५९ टक्के पाणीसाठा; पावसाची विश्रांती, वाढ मात्र संथ

या कारवाईनंतर कुरकुंभ एमआयडीसीतील इतर काही उद्योगांकडेही तपास यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आहे. संबंधित विभागांकडून आवश्यक परवानग्या, रासायनिक साठ्याची नोंद, उत्पादन प्रक्रिया आणि सुरक्षा नियमांचे पालन याची पडताळणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news