

कुरकुंभ: कुरकुंभ (ता. दौंड) येथील चिकन विक्रीच्या दुकानात गांजा विक्री सुरू होती. याठिकाणी छापा टाकून २० हजार ७४५ रूपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम आदम शेख (वय ३०, रा. कुरकुंभ, ता. दौंड) असे गुन्हा दाखल असलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत संजय कोठावळे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ३) हा गंभीर प्रकार उघडकीस आला. (Latest Pune News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील भरचौकात एका चिकन विक्रीच्या दुकानात गांजाची विक्री केली जात होती, अशी गोपनिय माहिती दौंड व कुरकुंभ पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी एक पथक तयार करून वरील दुकानात छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत १ किलो ३८३ ग्रॅम वजनाचा व २० हजार ७४५ रूपये किंमतीचा गांजा मिळून आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे, हवालदार किरण पांढरे, पठाण, राऊत, विजय पवार, संजय कोठावळे, महेंद्र गायकवाड यांचा सहभाग होता.